पुणे

शहरात देशभक्ती, एकात्मतेला प्रेरणा देणारे उपक्रम

CD

पुणे, ता. १७ : देशभक्ती आणि एकात्मतेला प्रेरणा देणाऱ्या उपक्रमांसह शहरातील विविध शाळांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पाषाण येथील लोकसेवा ई-स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ध्वजगीत, प्रेरणादायी भाषण व भारताच्या स्वातंत्र्य संग्रामावरील ‘स्लाइड शो’ सादरीकरण झाले. सांस्कृतिक कार्यक्रमात ‘फ्रीडम ऑन व्हील्स’ हे स्केटिंग सादरीकरण, ‘आजादी के रंग, वीरों के संग’ फॅन्सी ड्रेस स्पर्धा, ‘पोश्चर्स ऑफ पॅट्रिओटिझम’ योग सादरीकरण आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ या नृत्यनाट्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. यावेळी नंदन खुडियाडी, प्रतिभा भडसावळे, निवेदिता मडकीकर, मीनल एमजल, दीपाली गजभिये, पी.एच. शफीमोन, प्रा. नरहरी पाटील उपस्थित होते.
पूना कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये ‘एनएसएस’ व ‘एनसीसी’ युनिट्सच्या विद्यार्थ्यांचे संचलन पार पडले. याशिवाय, आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. इक्बाल शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा विभाग प्रमुख डॉ. अय्याज शेख, उपप्राचार्य इम्तियाज आगा, प्रा. नसीम खान, लेफ्टनंट कर्नल डॉ. शाकीर शेख (रजिस्ट्रार), इस्माईल सय्यद, प्रा. असद शेख, प्रा. इम्रान पठाण उपस्थित होते.
नूमवि मराठी शाळा, नूमवि प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शालांत परीक्षेत प्रशालेत प्रथम आलेला विद्यार्थी राज ठोंबरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. प्रशालेचे शाला समिती अध्यक्ष पराग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली समूहगीत, ध्वज प्रतिज्ञा, कवायत, मल्लखांब, लाठीकाठी आदी खेळांचे सादरीकरण केले. यावेळी मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, मुख्याध्यापिका अनुजा कांगणे, संगीता काळे, सुप्रिया फसाटे, आशा शिंदे, दत्तात्रेय वेताळ उपस्थित होते.
अंकुश मित्र मंडळ ट्रस्टतर्फे इंदिरानगर, लोअर बिबवेवाडी येथे लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात स्वतंत्रता, पर्यावरण, प्रदूषणमुक्त शहर अशी कल्पनाचित्रे मुलांनी काढली. यावेळी चित्रकार व शिल्पकार सतीश खरे, ओंकार पवार, अमित बडगू उपस्थित होते. त्यांनी गणेश मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक मुलांना करून दाखवले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मल्लिकार्जुन सिंदगी यांच्या हस्ते झाले. ॲड. प्रशांत साळुंके, सुषमा कोंडे, रोहिणी गरुड, शैलेंद्र नलावडे, निरंजन मारणे, अमोल कांटे उपस्थित होते.
नू.म.वि. मुलींची प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ‘आरएसपी’ पथक आणि बँड पथकाने संचलन केले. यावेळी प्रशालेची माजी विद्यार्थिनी अमिता चितळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सर्व उपस्थितांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून वंदन केले. प्रशालेच्या विद्यार्थिनींनी समूहगीत सादर केले. ओवी घुबे व उत्तरा शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सई पवार या विद्यार्थिनीने स्वातंत्र्यदिनाची माहिती सांगितली. प्रशालेच्या शाला समितीचे अध्यक्ष जयंत किराड यांनी मार्गदर्शन केले.
गुलटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या कै. कॅ. शिवरामपंत दामले प्रशालेत आगाशे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी महाराष्ट्रीय मंडळाचे सहकार्यवाह रोहन दामले, मार्गदर्शक मुख्याध्यापक रमेश वसईकर, चंद्रकांत आगाशे, प्राचार्य डॉ. सोपान कांगणे, संजय शेंडगे, आरती गायकवाड, आदिती लोमटे उपस्थित होते. दत्तात्रेय हेगडकर यांनी सूत्रसंचालन केले, तर अनिल तंवर यांनी आभार मानले.
रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये ‘भारतीय सण आणि त्यामागील विज्ञान’ या विषयावर तयार केलेल्या हस्तलिखिताचे उद्घाटन झाले. प्रशालेचे कार्यालयीन सेवक कमलाकर चिल्लाळ, प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी उत्तरा वालेकर, तानाजी मालुसरे यांचे वंशज नायब वैभव मालुसरे, डॉ. मानसी भाटे, मुख्याध्यापिका शुभांगी कांबळे, उपमुख्याध्यापक जयसिंग जगताप उपस्थित होत्या.
‘जेएसपीएम’च्या हडपसर संकुल येथे आयोजित कार्यक्रमात जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन कॉलेजच्या ‘परीस’ या वार्षिक अंकाचे उद्घाटन ग्रुपचे उपाध्यक्ष गिरिराज सावंत यांच्या हस्ते झाले. सिग्नेट पब्लिक स्कूल आणि जयवंत पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयांतर्गत नृत्य सादर केले. यावेळी संस्थेचे विश्वस्त ऋषिराज सावंत, संकुलाचे उपसंचालक मारुती काळबांडे, अॅग्नेस मॅसक्रेनस्, कल्पना निलाखे, उपप्राचार्य मंगेश चाटे, संगीता पाटील, रमा कापडी, वैशाली बधे उपस्थित होते.
सुहृद मंडळ पुणे, संचालित धायरी येथील कर्णबधिर मुलांची निवासी शाळेत सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत, राज्यगीत, संविधान वाचन करून
सामूहिक कवायत सादरीकरण झाले. त्यानंतर विद्यार्थी पारितोषिक वितरण, निवृत्त शिक्षक सत्कार व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक मोहन काणेकर, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक शिरीष पवार, महावितरण विभागातील अभियंता दीपक बाबर उपस्थित होते.
कोथरूडमधील न्यू इंडिया स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले. यावेळी श्री शिवराय प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष शशिकांत सुतार, संस्थेचे सचिव किसनराव बांदल, शाळेच्या संचालिका पूर्णा विद्वान्स उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan Interest Rate: एसबीआयनंतर 'या' बँकेचाही झटका! गृहकर्जाचे दर वाढले, सामान्यांना दिलासा नाही

माेठी बातमी! 'राज्यामध्ये दीड कोटी लाभार्थींचे धान्य बंद'; ई-केवायसीअभावी पुरवठा विभागाकडून कारवाई

Child Marriage : महाराष्ट्रात पुन्हा बालविवाह! कायद्याला चुकवून अल्पवयीन मुलीचं लग्न अन् अत्याचार, सात महिन्यांची गर्भवती

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Shashikant Shinde: शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; 'शेतकऱ्यांसाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे'

SCROLL FOR NEXT