पुणे

बाजारपेठा सजल्या आकाशकंदिलांनी

CD

पुणे, ता. १५ : दिवाळी जवळ आली की बाजारपेठा रंग, प्रकाश आणि उत्साहाने उजळून निघतात. या उत्साहात सगळ्यांच्या नजरा ज्याच्याकडे लागतात, तो म्हणजे आकाशकंदील! सणाला झळाळी देणारे हे आकर्षक कंदील आता केवळ पारंपरिक दिव्यांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर आधुनिक डिझाईन, रंगसंगती आणि क्रिएटिव्ह आयडियांनी सजलेले ‘फेस्टिव्ह लाइट आर्ट’ झाले आहेत.
कागद, कपडा आणि बांबूच्या पलीकडे जाऊन आता ज्यूट, अॅक्रेलिक शीट आणि कुंदन-मोती वापरून बनवलेले कंदील विशेष लक्ष वेधत आहेत. शहराचा मध्यभाग आणि परिसर सध्या आकाशकंदिलांच्या झगमगाटाने नटला आहे. कुठे पारंपरिक बांबूच्या पट्ट्यांचे हाताने विणलेले कंदील दिसतात, तर कुठे मेटॅलिक पेपर, प्लॅस्टिक शीट आणि फॅब्रिकपासून बनवलेले ट्रेंडी डिझाईन्स ग्राहकांना खुणावत आहेत.
काही कलाकार मात्र अजूनही पारंपरिक पद्धत जतन करत आहेत. गणेश पेठेतील नवनाथ कला केंद्र इथे अजूनही बांबूच्या पट्ट्यांवर रंगीत पेपर चिकटवून हाताने तयार केलेले कंदील मिळतात. त्यावर चित्रकला, वारली पेंटिंग किंवा मेंदी डिझाईनसारखी सजावट केली जाते. मॉल्समध्ये मात्र ग्लास आणि अॅक्रेलिकचे मॉडर्न आकाशकंदील, विविध थीम लाइट्ससह ‘कॉम्बो डेकोरेशन सेट’ विक्रीसाठी झळकत आहेत. काही ठिकाणी ‘डू-इट-युअरसेल्फ’ कंदील किट्सही ट्रेंडमध्ये आहेत. यंदा केवळ पारंपरिक आकाशकंदीलच नाही, तर ‘फ्लोटिंग लाइट्स’, ‘टी लाइट होल्डर्स’ आणि ‘लँटर्न कॉम्बो डेकोर सेट्स’ हेही बाजारात चर्चेत आहेत. हे सेट्स दिवे, कंदील आणि झुंबर या तिन्हींचं कॉम्बिनेशन देतात. दिवाळीच्या काही दिवस आधीच अमॅझॉन, फ्लिपकार्ट, इन्स्टाग्राम यांसह इतर समाजमाध्यमांवर कंदिलांची विक्री जोरात सुरू झाली आहे. पुण्यातील अनेक तरुणांनी आपली इंस्टाग्राम शॉप्स उघडून ‘हँडमेड कंदील’ विक्रीस ठेवले आहेत.

नवी फॅशन
- या वर्षी ‘स्मार्ट’ आणि ‘स्पेस-सेव्हिंग’ कंदिलांचा ट्रेंड जोरात आहे
- फोल्डेबल डिझाईन ः फ्लॅट पॅक कंदील
- मॉड्युलर एलइडी कंदील ः रंग बदलणारे, रिमोट कंट्रोलने चालणारे
- कला-प्रेरित कंदील ः मधुबनी, वारली, किंवा मंडल आर्टवर आधारित डिझाईन
- थीम डेकोर सेट्स ः एकाच रंगछटेत कंदील, झुंबर आणि दिवे कॉम्बो पॅक स्वरूपात

रंगीबेरंगी प्रकार
- थीम बेस्ड आकाशकंदील ः राम मंदिर, गणेश, शिव-शक्ती किंवा पर्यावरण या विषयांवर आधारित
- क्विक फोल्डेबल कंदील ः सहजपणे फोल्ड करून ठेवता येणारे, विशेषतः अपार्टमेंट्समध्ये राहणाऱ्यांची पसंती
- एलईडी लाइट कंदील ः कमी विजेचा वापर करणारे, विविध रंगांची लखलख देणारे
- हँडमेड पेपर आणि फॅब्रिक कंदील ः पुण्यातील महिला बचतगट आणि कॉलेज युवतींच्या हस्तकलेने बनवलेले, पर्यावरणपूरक कंदील
- ‘कुंदन-मोती’ सजावटीचे कंदील ः चमचमणाऱ्या दागिन्यांसारखे दिसणारे हे कंदील यंदा खास आकर्षण ठरत आहेत

सकाळपासून रात्रीपर्यंत ग्राहकांचा ओघ आहे. छोटे हातकंदील, झुंबर कंदील आणि पेपरबॉल कंदिलाला खूप मागणी आहे. दिवाळीचा मूड काही वेगळाच असतो. आम्ही कंदील मेटॅलिक शीट, अॅक्रेलिक प्लॅस्टिक आणि ज्यूट-क्लोथ यांचं मिश्रण वापरून बनवतो. त्यामुळे ते टिकाऊही राहतात आणि चमकदारही दिसतात.
- शेखर अवतडे, विक्रते
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT