पुणे

विधी अभ्यासक्रमात ‘कॅप’अंतर्गत १०० टक्के प्रवेश

CD

पुणे, ता. १५ : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) तीन वर्षे कालावधीच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशात ‘कॅप’अंतर्गत १०० टक्के प्रवेश यंदा झाले आहेत. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (कॅप) राज्यातील एकूण १९ हजार ८९५ जागांपैकी सर्वच्या सर्व जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
यंदा सीईटी सेलमार्फत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता तीन वर्षे कालावधीच्या विधी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया ३० जूनला सुरू झाली. ती ११ ऑक्टोबरपर्यंत सुरू होती. यात प्रवेशाच्या तीन फेऱ्या झाल्या असून, संस्थात्मक फेरीसह चार फेऱ्यांत ही प्रवेशप्रक्रिया झाली आहे. राज्यातील २१८ विधी महाविद्यालयांतील रिक्त जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. यावर्षी ‘कॅप’अंतर्गत १०० टक्के, तर ‘कॅप’सह ईडब्ल्यूएस आणि संस्थात्मक फेरी या तिन्ही जागा मिळून एकत्रित ९६ टक्के प्रवेश झाले आहेत. यंदा कॅप, ईडब्ल्यूएस आणि संस्थात्मक फेरी मिळून २३ हजार ८५९ जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. त्यातील २२ हजार ९१७ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यात १४ हजार ८४६ मुले आणि आठ हजार ७१ मुली आहेत. या प्रवेशात व्यवस्थापनाच्या कोट्यातील जागांवर ९९.९५ टक्के प्रवेश झाले आहेत. यातील एकूण दोन हजार २०५ जागांपैकी, दोन हजार २०४ जागेवर प्रवेश झाले असून, फक्त एक जागा रिक्त आहेत.

गेल्या तीन वर्षांतील प्रवेशाची आकडेवारी
शैक्षणिक वर्ष : महाविद्यालयांची संख्या : एकूण जागा : प्रवेशाची टक्केवारी : रिक्त जागा
२०२३-२४ : १६२ : १९,३४१ : १८,७४८ : ९६.९३ टक्के : ५९३
२०२४-२५ : १६७ : २१,०७१ : २०,३७४ : ९६.६९ टक्के : ६९७
२०२५-२६ : २१८ : २३,८५९ : २२,९१७ : ९६.०५ टक्के : ९४२

मागील काही वर्षांपासून विधी अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या ९६ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. या वर्षी प्रवेशाच्या चार फेऱ्या झाल्या आणि ही प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडली.
- दिलीप सरदेसाई, आयुक्त, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT