पुणे

जैविक उत्खनन निविदेवर ठेकेदारांचा डोळा

CD

ब्रिजमोहन पाटील ः सकाळ वृतसेवा
पुणे, ता. २४ ः फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपोमधील तब्बल २८ लाख टन कचऱ्याचे जैविक उत्खनन (बायोमायनिंग) करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येकी ५.६० लाख टनाच्या पाच निविदा काढल्या जाणार आहेत. मात्र, यात एकाच ठेकेदाराची मक्तेदारी झाल्यास किंवा रिंग झाल्यास प्रतिटन ९०० रुपयांपेक्षा जास्त आल्यास महापालिकेला अडीचशे कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. पण अधिकाऱ्यांनी कडक भूमिका ठेवल्यास व जास्तीत जास्त ठेकेदार पात्र झाल्यास किमान १०० कोटी रुपयांची बचत होऊ शकते. दरम्यान, ही निविदा पदरात पाडून घेण्यासाठी ठेकेदारांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
पुणे महापालिकेने फुरसुंगी-उरुळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये वर्षानुवर्षे कचरा उघड्यावर टाकलेला आहे. या कचऱ्यामुळे या परिसरातील हवा, पाणी प्रदूषण झाले आहे. त्यानंतर महापालिका प्रशासनाने या ठिकाणी पडलेल्या कचऱ्याचे कॅपिंग केले. पण त्यामुळे प्रदूषण रोखता आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) याचिका दाखल केली होती. त्यामध्ये या ठिकाणी पडलेल्या सुमारे ५९ लाख मेट्रीक टन कचऱ्याचे बायोमायनिंग करून डेपोची जागा ऑक्टोबर २०२६ पर्यंत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आत्तापर्यंत २०१६, २०२१ व २०२३ या वर्षात प्रत्येकी एक याप्रमाणे तीन निविदा काढून ३१ मेट्रीक टन कचऱ्याचे बायोमायनिंग केले आहे.

३१ लाख टन करण्यासाठी मोजले २४४ कोटी
कचरा डेपोमध्ये २०१८, २०२१ च्या निविदांसाठी सुमारे १४७ कोटी १३ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. त्यानंतर आता २०२४ मध्ये काढलेल्या ठेकेदाराला तब्बल ९७ कोटी रुपये दिले जाणार आहेत. अशा पद्धतीने ३१ लाख मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुमारे २४४ कोटी १३ लाख रुपये मोजले आहेत. कचरा डेपोमध्ये अजून २८ लाख मेट्रिक टन पडून आहे. त्याची निविदा मिळविण्यासाठी ठेकेदारांकडून मोठ्याप्रमाणात राजकीय दबाव आणून वाढीव दर भरून काम घेण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.

एकाला एकच निविदा
२८ लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया करताना त्यासाठी प्रत्येकी ५.६० लाख टनाच्‍या पाच निविदा काढल्या जाणार आहेत. एका ठेकेदाराला एकाच निविदेचे काम दिले जाणार आहे. मात्र, यामध्ये काही ठेकेदारांना मोठा वाटा मिळावा यासाठी एकाला किमान दोन निविदा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच पाचही निविदेत रिंग करून ठेकेदार स्वतःचा फायदा करून घेण्याचा खटाटोप करत आहेत. या निविदा काढताना केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (महुआ) नियमावलीनुसार निविदा काढल्या जात जाणार आहेत. मात्र, पाच निविदांमध्ये एखाद्या ठेकेदाराने अतिशय कमी रकमेत काम करण्याची तयारी दाखवली, तेथे अन्य ठेकेदार काम करण्यास तयार नसल्यास अशा वेळी एका ठेकेदाराला दोन निविदांचे काम दिले जाऊ शकणार आहे, अतिरिक्त आयुक्तांनी ही अट टाकली आहे. त्यामुळे आता या कामाचा दर कमी होणार याकडे लक्ष लागले आहे.

केंद्राकडून मिळाले १५४ कोटी
केंद्र सरकारतर्फे १५व्या वित्त आयोगातून बायोमायनिंगच्या कामासाठी १५५ कोटी रुपये महापालिकेला मिळावेत असा प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन विभागाने पाठवला होता. त्यानुसार ‘मुहआ’च्या नियमानुसार बायोमायनिंगसाठी एका टनाला ५५० रुपये इतका दर निश्‍चित केला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेला १५४ कोटी रुपये मिळाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०२६ पर्यंत महापालिकेला बायोमायनिंगचे काम पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. फुरसुंगी कचरा डेपो येथे २८ लाख टन कचरा शिल्लक असल्याने प्रत्येकी ५.६० लाख टनाच्या पाच निविदा काढल्या जाणार आहेत. एका ठेकेदाराला एकच काम मिळावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

आतापर्यंतच्या तीन निविदांमध्ये झालेला खर्च
२०१८
बायोमायनिंग केलेला कचरा - ११ लाख मेट्रिक टन
टिपिंग शुल्क - ६४७ रुपये प्रतिटन
एकूण खर्च - ७१ कोटी १७ लाख

२०२२
बायोमायनिंग केलेला कचरा - ९ लाख मेट्रिक टन
टिपिंग शुल्क - ८४४ रुपये प्रतिटन
एकूण खर्च - ७५ कोटी ९६ लाख

२०२४
बायोमायनिंग केलेला कचरा - १० लाख मेट्रिक टन
टिपिंग शुल्क - ९७९ रुपये प्रतिटन
एकूण खर्च - ९७ कोटी

देशातील अन्य महापालिकांमधील बायोमायिंगचा प्रतिटन दर (रुपयांमध्ये)
पिंपरी-चिंचवड -७००
मुंबई - १३७३
मीरा भाईंदर -४४२
संभाजीनगर -६७१
कल्याण डोंबिवली - ८८६
नागपूर - ७८०
वसई विरार - ८३५
भोपाळ - ५५०
कोइंबतूर - ६९३
ग्रेटर नोईडा - ७२७
कोची - १६९०
लखनौ - ७१०
चेन्नई - ९६३
चंडीगड - ६००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panvel to Karjat: आता पनवेल ते कर्जत प्रवास फक्त एक तासात होणार, नवीन रेल्वे प्रकल्प अंतिम टप्प्यात, सेवा कधी सुरू होणार? वाचा...

लग्न करू नको...२९ लाख रुपये देते, आईची मुलीला अनोखी ऑफर, पण कारण काय?

'तुमच्या जाण्यानंतर आयुष्य थांबल्यासारखं वाटतय..' प्रार्थना बेहरेला पितृशोक, अपघातात झाला मृत्यू, बाबांसाठी भावूक झाली अभिनेत्री

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा दणका! अवघ्या दोन तासात ९५ मि.मी.पावसाची नोंद

Cracked Heels: भेगांमुळे सतत टाच दुखत आहे का? मग हा 2 मिनिटांचा नैसर्गिक उपाय वापरा

SCROLL FOR NEXT