पुणे

दिवाळी अंक

CD

१) आवाज
संपूर्णपणे विनोदाला वाहिलेल्या विनोदी अंकात ‘आवाज’च्या दिवाळी अंकाचा ‘आवाज’ दरवर्षी जोरदार घुमतो. यंदा अंकाचे अमृतमहोत्सवी वर्षे आहे. त्यानिमित्त गेल्या ७५ वर्षातील गाजलेली व्यंगचित्रे, निवडक जादुई मुखपृष्ठे यांचा यात समावेश आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्वरराज ठाकरे यांची निवडक व्यंगचित्रे अंकात आहेत. मुकुंद टाकसाळे, मंगला गोडबोले, श्रीकांत बोजेवार, संतोष पवार, विजय कापडी, सु. ल. खुटवड, ज्युनिअर ब्रह्मे, सॅबी परेरा, मिलिंद शिंत्रे, अशोक मानकर आदींच्या सदाबहार विनोदी कथांनी अंकाची उंची वाढली आहे. डॉ. यशवंत पाटील यांची ‘टिंगलगाणी’ वाचकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवल्याशिवाय राहत नाहीत. सुरेश सावंत, प्रभाकर दिघेवार, महेंद्र भावसार, विवेक मेहेत्रे, प्रभाकर झळके, संजय मिस्त्री, श्रीनिवास प्रभुदेसाई, ज्ञानेश बेलेकर, प्रशांत कुलकर्णी, जगदीश कुंटे आदींची हास्यचित्रे आहेत. संजय घाटे यांच्या वात्रटिका आहेत.
संपादक ः भारतभूषण पाटकर, पाने ः २३६, किंमत ः ४५० रुपये.

२) अक्षरधारा

कथा, लेख, अनुवादित कथा यांसह विविध विभागांनी यंदाचा अंक सजला आहे. विश्‍वास पाटील यांनी कादंबरीकार र. वा. दिघे यांचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे. गणेश मतकरी, स्मिता घैसास, प्रसाद नामजोशी, गौरी लागू यांच्या आशयसंपन्न कथांचा अंकात समावेश आहे. ‘स्त्री स्वातंत्र्याच्या साक्षीदार’ या विशेष विभागासाठी डॉ. अरुणा ढेरे, मृदुला भाटकर, डॉ. उमा कुलकर्णी यांनी लेखन केले आहे. ‘जन्मशताब्दी विशेष’ विभागात श्रीनिवास खळे यांच्यावर डॉ. मृदुला दाढे यांचा लेख आहे, तर शंकर पाटील यांच्यावर मधुकर धर्मापुरीकर यांनी लेखन केले आहे. याशिवाय डॉ. नितीन रिंढे, मंगला गोडबोले, डॉ. द. दि. पुंडे यांच्या लेखांचा आस्वाद वाचकांना घेता येणार आहे.
संपादक : स्नेहा अवसरीकर, पाने : २१२, किंमत : ३५० रुपये.
---
३) भवताल
वाटा-रस्ते-मार्ग हा यंदाच्या अंकाचा विषय असून, त्याचे विविध कंगोरे उलगडण्याचा प्रयत्न मान्यवर लेखक व तज्ज्ञांनी केला आहे. आदिमानवाच्या स्थलांतराच्या वाटा या विषयावर प्रा. सुभाष वाळिंबे यांनी माहिती दिली आहे. हडप्पाकालीन मार्गांवर प्रा. जे. एस. खरकवाल व पायल सेन यांनी लेखन केले असून, अंतराळातील मार्ग याबाबत डॉ. प्रमोद काळे व डॉ. अरविंद शालिग्राम यांनी प्रकाश टाकला आहे. रेल्वेच्या मार्गांबाबत डॉ. प्रदीप डुबल यांनी लेखन केले आहे. सुरत मोहिमेचे मार्ग या ऐतिहासिक विषयावर गिरीश टकले यांनी लेखन केले असून, दक्षिण दिग्विजयाच्या मार्गाची माहिती सदानंद कदम यांनी दिली आहे. याशिवाय डॉ. सचिन जोशी, डॉ. केशव देशमुख, डॉ. मानसी केळकर, कौस्तुभ दिवेगावकर यांसह विविध लेखकांच्या लेखांचा अंकात समावेश आहे.
संपादक : अभिजित घोरपडे, पाने : २४४, किंमत : ३५० रुपये.
---
४) आनंदतरंग

‘नातं निसर्गाशी’ या संकल्पनेवर आधारित यंदाचा अंक आहे. ‘निसर्गऋषी’ विभागात मारुती चितमपल्ली यांच्यावर
विवेक देशपांडे यांनी लेखन केले आहे. सलिम अली यांचे व्यक्तिचित्र डॉ. माधव गाडगीळ यांनी उलगडले आहे. ‘नातं निसर्गाशी’ या विभागात आत्मयोगगुरू डॉ. संप्रसाद विनोद, आभा भागवत, दिप्ती नवल, अदिती देवधर यांचे लेखन आहे. ‘निसर्गरत’साठी किरण पुरंदरे यांनी अनुभव कथनपर लेख लिहिला आहे. बुरशीचे महत्त्व सांगणारा लेख किरण रणदिवे यांनी लिहिला आहे. ‘निसर्गगान’मध्ये डॉ. प्रितीराणी जुवेकर, सुरेश शेठ, रमण रणदिवे, स्वाती प्रभुमिराशी यांच्या रचनांचा समावेश आहे.
संपादक : पराग पोतदार, पाने : १४४, किंमत ः ३०० रुपये
---
५) ज्योतिष ज्ञान
नवीन वर्षातील घडामोडींबद्दल उत्सुकता, अंदाज ‘ज्योतिष ज्ञान’च्या अंकातून वर्तविला आहे. राजकीय, सामाजिक आणि नैसर्गिक घडामोडींचे भाकीत, हे या अंकाचे वैशिष्ट आहे. अंकाची सुरवातच भारतासाठी, महाराष्ट्रासाठी नवे वर्ष कसे राहील, हे सांगण्यापासून झाली आहे. २०२६ चे पर्जन्यमान, शेअर बाजार कसा असेल हेही विशद केले आहे. कुंडली गुणमीलनातील नाडी दोष, घटस्फोट,
वास्तुशास्त्र, दत्तक संतती योग, आधुनिकतेमुळे विवाह व कुटुंब व्यवस्थेवर झालेला परिणाम, नेत्रविकार, हृदयरोग, प्रेमविवाह, आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाहाची भाकिते वर्तविली आहे. याशिवाय भविष्याशी निगडित विविध विषय यात हाताळले आहेत.
संपादक ः सिद्धेश्‍वर मारटकर. पाने ः ३०२, किंमत ः ३५० रुपये
---------------------------

६) भविष्य
धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांचा आढावा ‘भविष्य’च्या दिवाळी अंकात घेण्यात आला आहे. वैवाहिक समस्यांची कारणे स्पष्ट करून, त्यांवरील उपाय स्पष्ट करणारा प्रदीर्घ लेख अंकाचे वैशिष्ट्य आहे. प्रलयकारी घटनांचा ज्योतीषशास्त्रीय विचार आनंद भुतडा यांनी स्पष्ट केला आहे. नामस्मरणाचे महत्त्व गुरुशांतलिंग स्वामी यांनी सांगितले आहे. कुंभमेळ्याची माहिती प्रकाश जंगम यांनी दिली आहे. सूर्योपासनेवर सुनील सुर्वे यांनी लेखन केले आहे. नाथपंथाची सविस्तर माहिती सुनील शेंडे यांनी दिली आहे.
संपादक : स्वामी विजयकुमार, पाने : १३६, किंमत ः २०० रुपये
---
७) अपेक्षा
यंदाचा विशेषांक ‘आजची विवाह समस्या’ यावर आहे. या अंकात नात्यांचे बदलते पैलू आणि आयुष्याचे तत्त्वज्ञान सुंदरपणे मांडले आहे. अजित काटकर, चंद्रलेखा जगताप-बेलसरे, उत्तम सदाकाळ, न्या. सुनील वेदपाठक, एकनाथ गायकवाड, डॉ. छाया महाजन, अरुण सावळेकर तसेच डॉ. कीर्ती जाधव, ॲड. संध्या गोळे आदींच्या कथा अंकात आहेत. ‘आजची विवाहसमस्या’ या परिसंवादात अनघा ठोंबरे, सीमा गांधी, ॲड. अरूण बिरदवडे, प्राचार्य श्‍याम भुर्के, भारती सावंत, संदीप तापकीर, प्रा. विजय लोंढे, अनिल ठोंबरे, पुष्पा कुलकर्णी, अनुराधा गडकरी आदींनी भाग घेतला आहे. धनंजय उपासनी, राजेंद्र मराठे, विद्याधर चव्हाण, प्रदीप गांधलीकर यांनी ‘परिचय’ अंतर्गत मान्यवरांचे परिचय करून दिले आहेत. श्रीकांत ताम्हणकर, डॉ. संजय जगताप, शरयू रावेतकर, वंदना घाणेकर, श्रीराम भोमे आदींनी विविध विषयांवर लेख आहेत. ‘काव्यकक्ष’मध्ये ७५ कवितांचा समावेश आहे.

संपादक : दत्तात्रेय उभे, पाने ः २८०, किंमत : २७० रुपये

८) पुरोगामी जनगर्जना
हा दिवाळी विशेषांक म्हणजे ज्ञान, विचार आणि संवेदनांचा एक सुंदर संगम आहे. डॉ. अभिजित वैद्य, डॉ. वंदना पलसाने, स्वातिजा मनोरमा, सुहास परांजपे, प्रभाकर नानावटी आदी लेखकांनी विविध विषयांवर चिकित्सक दृष्टीने भाष्य केले आहे. डॉ. नितीन हांडे यांची कथा आहे. त्याचबरोबर कल्पना पांडे, डॉ. परिमल माया सुधाकर, ॲड. संजय पांडे, संध्या एदलबादकर, नितीन ब्रह्मे, सलीम मोमीन, प्रा. संजीव चांदोकर आदींचे विविध विषयांवर लेख आहेत.

संपादक : डॉ. अभिनित वैद्य, किंमत : १५० रुपये, पृष्ठ संख्या : १०८
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Name Change Demand : आता थेट दिल्लीच्याही नावात बदल होणार? ; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना 'या' व्यक्तीने पाठवलंय पत्र!

Balapur News : भिंत कोसळून आठ वर्षीय चिमुकला ठार; गावावर शोककळा

Women's World Cup 2025: भारताचा बांगलादेशविरुद्ध सामना पावसामुळे रद्द! साखळी फेरी संपली पाँइट्सटेबलमध्ये कोण कोणत्या स्थानी?

Tejashwi Yadav on Waqf Act : ‘’…तर आम्ही ‘वक्फ कायदा’ कचऱ्याच्या डब्यात टाकू’’ ; तेजस्वी यादव यांचं मोठं विधान!

Mohol Politics : अखेर ठरलं! सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचा बुधवारी हजारो कार्यकर्त्यासह भाजपात होणार प्रवेश

SCROLL FOR NEXT