पुणे

‘एक डॉक्टर घडताना’ कार्यक्रमाचे आयोजन

CD

पुणे, ता. २४ ः असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया (एपीआय) पुणे शाखेच्या वतीने ‘शिरीष थिएटर्स’ आणि ‘रियाज ग्रुप’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक डॉक्टर घडताना’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एक जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजता बालगंधर्व रंग मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात डॉक्टर म्हणून घडताना आलेले अनुभव, आव्हाने आणि संघर्ष यावर प्रकाश टाकला जाणार आहे, अशी माहिती संघटनेचे डॉ. संजय गांधी, खजिनदार डॉ. अमित वाळिंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. प्रीती घोलप, डॉ. सचिन यादव आणि डॉ. अनिकेत जोशी उपस्थित होते. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यापासून डॉक्टर होण्यापर्यंतचा आणि त्यानंतर प्रॅक्टीस सुरू झाल्याचा प्रवास गाण्यांच्या माध्यमांतून मांडण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना डॉ. घोलप यांची आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती डॉ. घोलप यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Fare Update : दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळाचा दिलासा, हंगामी भाडेवाढ केली रद्द

Nashik Crime : अवैध पार्सल पॉईंट्स राजरोसपणे सुरू; रात्री उशिरा टवाळखोर गुंडांचा धिंगाणा, पोलिसांचे दुर्लक्ष

Pachod News : धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे म्हणून धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाट्यावर रास्ता रोको

Crops MSP: 'या' पिकांवरील एमएसपी वाढला, डाळींसाठी नवीन धोरण जाहीर... शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: नाशिकमधील गुन्हेगारीविरोधात शिवसेना-भाजप आमदार आक्रमक!

SCROLL FOR NEXT