पुणे

बीपीएमएस पोर्टल ऑनलाइन प्रशिक्षण

CD

पुणे, ता. ३ : आजच्या डिजिटल युगात बांधकाम परवानग्यांची प्रक्रिया अधिक वेगवान व पारदर्शक झाली आहे. अशावेळी बीपीएमएस पोर्टल व प्री-डीसीआर (PREDCR) प्रणाली समजून घेणे हे वास्तुविशारद, स्थापत्य अभियंते व नगर नियोजकांसाठी अत्यावश्यक झाले आहे. ८ डिसेंबरपासून सुरू होणारे बीपीएमएस पोर्टल ऑनलाइन प्रशिक्षण हे व्यावसायिक कौशल्य वाढवण्याची उत्तम संधी आहे. केवळ एका महिन्यात यूडीसीपीआर (UDCPR) नियोजन नियम, बिल्डिंग परवाना प्रक्रिया, योग्य ड्रॉइंग सबमिशनसाठी स्किल्स आणि प्री-डीसीआर टेस्टिंग यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रभुत्व मिळवणे शक्य आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन महिन्यांसाठी व्हाट्सॲप साहाय्य, रेकॉर्ड केलेल्या सत्रांना आजीवन प्रवेश, टीपी क्लायंट सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल.

हायड्रोपोनिक्स ऑनलाइन लेक्चर सिरीज
ताजा व विषमुक्त भाजीपाला स्वतः पिकवायचा असेल तर हायड्रोपोनिक्स शेती म्हणजेच मातीविरहित शेती हा एक उपयुक्त पर्याय आहे. या पार्श्वभूमीवर हायड्रोपोनिक्स, एक्वापोनिक्स, एरोपोनिक्स, घरासाठी हायड्रोपोनिक्स आणि हायड्रोपोनिक चारा इत्यादी संदर्भाने मार्गदर्शन करणारी पाच दिवसांची ऑनलाइन लेक्चर सिरीज ८ डिसेंबरपासून आयोजिली आहे. यामध्ये हायड्रोपोनिक, एक्वापोनिक आणि एरोपोनिक प्रणाली लागू करण्यासाठीची व्यावहारिक कौशल्ये व माहिती, वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी घरगुती हायड्रोपोनिक्स व हायड्रोपोनिक चारा यांचे फायदे, शाश्वत शेती व पशुधन आहार उपायांमधील संधी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

लँडस्केप गार्डनिंग कार्यशाळा
घराच्या आजूबाजूला उपलब्ध जागेमध्ये आकर्षक लँडस्केप गार्डन तयार करण्यासाठी लागणारे ज्ञान, गार्डनचे प्रकार, तयार करण्याची तत्त्वे, डिझाइन करण्याची पद्धत तसेच झाडांची निवड, गार्डनमधील रस्ते, बॉर्डरला लावली जाणारी झाडे व त्यांची निवड आदींविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १३ व १४ डिसेंबरला आयोजिली आहे. कार्यशाळेत लँडस्केप गार्डनिंगचा परिचय, गार्डनमध्ये झाडांच्या वेगवेगळ्या डिझाइन तयार करण्याच्या पद्धती, साइटचे मूल्यांकन व तयारी, लँडस्केपिंग टेक्निक्स, खत व पाणी नियोजन, देखभाल पद्धती, पर्यावरणविषयक विचार, क्लायंट कम्युनिकेशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट, सुरक्षा आणि नियम, लँडस्केप गार्डनिंगमधील भविष्यातील ट्रेंड आदींविषयी मार्गदर्शन होणार आहे. लँडस्केपिंगमध्ये करिअरच्या संधी शोधणाऱ्यांना तसेच वैयक्तिक बागकामामध्ये स्वारस्य असणाऱ्यांना कार्यशाळा उपयुक्त आहे.

पेस्ट कंट्रोल व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा
पेस्ट कंट्रोल व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी, तसेच विद्यमान टेक्निशियन व फॅसिलिटी मॅनेजमेंट क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा १९, २० व २१ डिसेंबरला आयोजिली आहे. यामध्ये पेस्ट मॅनेजमेंटची मूलभूत तत्त्वे, विविध कीटकांची ओळख, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, रसायनांचा सुरक्षित वापर, आवश्यक उपकरणांची माहिती तसेच शासन नियमांबाबत सखोल मार्गदर्शन मिळेल. यासह प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, व्यवसाय नोंदणी व परवाने, निविदा प्रक्रिया, किंमत ठरविणे, एएमसी करार, तसेच डिजिटल मार्केटिंगद्वारे ग्राहक मिळविण्याचे कौशल्य आदींबाबतही माहिती दिली जाणार आहे. नवीन उद्योजक, टेक्निशियन, हॉस्पिटॅलिटी, सिक्युरिटी व लेबर कॉन्ट्रॅक्टर व्यावसायिकांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Nashik Railway : रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती: पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार; पहिल्या टप्प्यात ८,९७० कोटींचा खर्च

Excise Law: सिगारेटसह पान मसाल्याच्या किमती वाढणार! लोकसभेत मोठा निर्णय; हे विधेयक का आणले गेले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील सर्व शाळा उद्या बंद

Malegaon News : घरकुल लाभार्थ्यांचे सुमारे सहा कोटी रुपये थकले; प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान हिशोब विभागाच्या दिरंगाईमुळे रखडले

Viral Video: 'सनम तेरी कसम...' गाण्यावर डान्स करणाऱ्या नव वधु-वराचा व्हिडिओ तुफान व्हायरल, यूजर्सच्या मजेदार कमेंटचा पाऊस

SCROLL FOR NEXT