पुणे

सुनीताबाई देशपांडे स्मृती साहित्य संमेलन उद्या

CD

पुणे, ता. ४ ः सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्यातर्फे आयोजित सुनीताबाई देशपांडे स्मृती साहित्य संमेलन शनिवारी (ता. ६) रंगणार आहे. ज्येष्ठ लेखिका-कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली या संमेलनात दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत.
सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वि. का. राजवाडे सभागृहात सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत हे संमेलन होणार आहे. कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयल हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. पं. सत्यशील देशपांडे यांच्या ‘स्वरांजली’ कार्यक्रमाने संमेलनाचा प्रारंभ होणार असून, सुनीताबाईंना आवडणाऱ्या बंदिशींचे सादरीकरण पं. देशपांडे करणार आहेत. सकाळी १०.३० वाजता ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन होईल. पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी १२.३० वाजता ‘साहित्यिक सुनीताबाई’ या विषयावरील चर्चासत्रात ज्येष्ठ लेखिका रेखा इनामदार-साने, मोनिका गजेंद्रगडकर आणि डॉ. आशुतोष जावडेकर सहभागी होतील. गौरी लागू या सत्राचे सूत्रसंचालन करतील. दुपारी २.३० वाजता ‘कवितांजली’ या कार्यक्रमातून रसिकांना पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांनी अभिवाचन केलेल्या कवितांचा पुनःप्रत्यय घेता येणार आहे. याचे संहितालेखन डॉ. अरुणा ढेरे यांनी केले असून, डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी आणि विराज सवाई अभिवाचन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cooperative Strike : महाराष्ट्रात गटसचिवांचे असहकार आंदोलन, संगणकीय कामकाजावर बहिष्कार

T20 World Cup IND vs NAM :६,६,६,६,४! इशान किशनचे २० चेंडूंत अर्धशतक, संजू सॅसमननेही ३०० च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा...

Latest Marathi News Live Update: स्थायी समिती कोणाकडे? आज होणार यादी जाहीर

Ambegaon News : शिरदाळे येथील गावच्या तळ्यात मासे पकडताना साहेबराव केदारी यांचा पाण्यात बुडून मृत्यू

Horoscope : उद्याचा दिवस 'या' ४ राशीच्या लोकांसाठी लकी; अचानक मिळतील पैसे, प्रेम आणि नातेसंबंधात मोठा बदल, नोकरी-व्यवसायात यश

SCROLL FOR NEXT