पुणे

तेजवाणीचा वारसदारांबरोबर एकरी ४० लाखांचा करारनामा मुंढव्यामधील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरण

CD

पुणे, ता. ४ ः मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवाणीने २००६ ते २००८ दरम्यान जमिनीच्या मूळ वतनदारांच्या वारसांशी विकसन करारनामा केलेला होता. त्यानुसार विकसन मोबदल्याची किंमत प्रती एकर ४० लाख रुपये ठरली होती. हा मोबदला रिग्रँट होऊन, वतनदार यांचा हिस्सा निश्चित झाल्यानंतर पुढील वर्षभरात देण्याचे ठरले होते. तसेच विकसन करारनाम्यामध्ये थोड्या प्रमाणात धनादेशाद्वारे वतनदार यांना रक्कम दिल्याचे नमूद केले आहे, पोलिस तपासातून ही बाब पुढे आले आहे.
तेजवाणी (वय ४४, मूळ रा. ३०५, ३ रा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई, सध्या राहणार बी ९०१, ऑक्सफर्ड हॉलमार्क, कोरेगाव पार्क) हिला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून बुधवारी (ता. ३) सायंकाळी अटक करण्यात आली. तिला गुरुवारी (ता. ४) न्यायालयात हजर करण्यात आले होते.

अकरा हजारांचा डीडी जमाच झाला नाही
मुंढवा येथील जमीन रिग्रँट झालेली नसताना, शासनाचे किंवा जिल्हाधिकारी यांचे जमीन रिग्रँट झाल्याबाबतचे कोणतेही आदेश नसताना तसेच जमिनीचा कब्जा हक्काचा सारा भरण्याबाबत कोणतेही चलन भरण्याचा आदेश झालेला नसतानाही तेजवाणी हिने परस्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जानक शाखेत एक पत्र जमा केले. त्या पत्रामध्ये ११ हजार रुपयांचा डीडी जमा कब्जा हक्काची रक्कम म्हणून भरीत असल्याचे नमूद केले होते. हा डीडी अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शासकीय कोषागारात जमा झालेला नाही, अशी माहिती तपास अधिकारी आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय वाघमारे यांनी न्यायालयास दिली.
जमीन शासनाच्या मालकीची व ताब्यात असल्याने त्याबाबत तत्कालीन तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी नियमावली तपासून त्याबाबत वरिष्ठ कार्यालयास कळविणे आवश्यक होते. परंतु, त्यांनी तसे न करता आरोपींशी संगनमत करून जमिनीचा ‘अमेडिया इंटरप्रायझेस एलएलपी’ यांना तत्काळ ताबा द्यावा, असे पत्र बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांना दिले. आरोपींनी आपापसात गुन्हेगारी कट रचून शासनाची जमीन हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे, असे पोलिसांनी न्यायालयास सांगितले.


याचा होणार तपास ः
- तेजवाणी हिने ११ हजार रुपयांचा डीडी कोणत्या आधारे भरला
- जमिनीच्या किमतीचा खरेदी खतामध्ये काही उल्लेख का केला नाही?
- रक्कम रोख व इतर मार्गाने घेतली किंवा कशी घेतली
- या गुन्ह्याचा कट करण्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत?
- जमिनीचे पैसे कोणत्या मार्गाने व कोणत्या खात्यामध्ये कसे घेतले आहेत?

तेजवाणीवर नऊ गुन्हे
तेजवाणीवर पिंपरी पोलिस ठाण्यात विश्वासघात केल्याप्रकरणी सहा गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर हिंजवडी, शिवाजीनगर आणि बावधन पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. अशा प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे करण्यात ती सराईत आहे.
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

कोणाला टबमध्ये बुडवून मारलं, तर कोणाला हौदात, सायको आंटीची चार मर्डरवाली खतरनाक काहानी!

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

SCROLL FOR NEXT