पुणे

‘एमपीएससी’ परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

CD

प्रज्वल रामटेके : सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. ५ : नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या २ आणि २० डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची मतमोजणी ही एकत्रित २१ डिसेंबरला होणार आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र गट ‘ब’ अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २१ डिसेंबरला होणार आहे. जिल्हा पातळीवर परीक्षेची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाकडे असते. जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल विभागातील सर्व कर्मचारी हे २१ डिसेंबरला मतमोजणीत व्यग्र राहणार आहेत. परिणामी परीक्षा केंद्रांवर नियंत्रण कोण ठेवणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे २१ डिसेंबरची संयुक्त पूर्व परीक्षा होणार की पुन्हा पुढे ढकलली जाणार? असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे.
आयोगामार्फत दरवर्षी पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय), राज्य कर निरीक्षक (एसटीआय) आणि सहायक कक्ष अधिकारी (एएसओ) या पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते. यंदा ६७४ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी ३, राज्य कर निरीक्षक २७९ पदे आणि पोलिस उपनिरीक्षकाच्या ३९२ पदांचा समावेश आहे. सुरुवातीला ‘संयुक्त पूर्व गट ‘ब’ २०२५ (अराजपत्रित) परीक्षा’ ९ नोव्हेंबरला होणार होती. मात्र, राज्यातील काही भागांत आलेल्या पूर परिस्थितीमुळे राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली. ती परीक्षा नोव्हेंबर महिन्यात झाल्याने त्याचा परिणाम संयुक्त पूर्व परीक्षेवर झाला. यानंतर २१ डिसेंबरला संयुक्त पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय झाला निवडणूक आयोगाने सुरुवातीला २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणीची तयारी केली होती. मात्र, न्यायलयीन खटल्यांचा पेच निर्माण झाल्याने २ नोव्हेंबरला होणारी काही पालिकांमधील निवडणूक २० डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे आणि २० डिसेंबर रोजी दोन्ही टप्प्यांतले मतदान पार पडल्यानंतर सर्व नगरपालिका व नगर पंचायतींचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे या परीक्षेबाबत संभ्रम आहे. यासंदर्भात आयोगाशी संपर्क साधला असता, आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘‘या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली आहे. लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल.’’ तसेच ही परीक्षा पुढे ढकलली जाईल अशी शक्यता असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे.
याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ते म्हणाले, ‘‘नोव्हेंबरची परीक्षा पूर परिस्थितीमुळे पुढे ढकलली. आता मतमोजणीचा पेच. एकीकडे अभ्यास अंतिम टप्प्यात आला आहे, तर दुसरीकडे परीक्षा होणार की नाही याची खात्री नाही. दरवेळी ऐन परीक्षेच्या तोंडावर परीक्षा पुढे ढकलली जाते त्यामुळे अभ्यासाचे संपूर्ण नियोजन बिघडते. वर्षभराचे नियोजन या तारखांवर अवलंबून असते. आम्ही परीक्षेची तयारी करावी की तारखेच्या घोळात अडकावे? त्यामुळे आयोगाने तातडीने परिपत्रक प्रसिद्ध करत स्पष्टीकरण द्यावे.’’

मतमोजणी आणि परीक्षा एकाच दिवशी असताना संपूर्ण यंत्रणा सुरळीत चालेल का, याची शंका आहे. जिल्हाधिकाऱ्यांपासून ते तळागाळातील महसूल कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेजण मतमोजणीत व्यग्र असतील. मग परीक्षा केंद्रांवर सुरक्षा, पर्यवेक्षण, कक्षअधिकारी यामध्ये गोंधळ झाल्यास त्याचा फटका आम्हा विद्यार्थ्यांनाच बसेल. त्यामुळे परीक्षा वेळेत होणार असेल तर त्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता आयोगाने घ्यावी.
- एक विद्यार्थी

मी गावाहून पुण्यात परीक्षेसाठी येतो. हॉल तिकीट आलं त्या दिवसापासून प्रवास, निवास, खर्च हे सगळे ठरविले आहे. प्रत्येक बदलामुळे पुन्हा नव्याने योजना करावी लागते. अशा अनिश्चिततेमुळे मानसिक आणि आर्थिक दोन्ही ताण येतो. त्यामुळे परीक्षा कधी होणार या संदर्भात आयोगाने एकदाच स्पष्ट भूमिका मांडावी, ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे.
- एक विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : आचारसंहितेच्या धास्तीने निविदा मंजुरीसाठी धडपड; ४०० कोटीच्या कामाचे प्रस्ताव मंजूर

Hockey India League : नवनीत कौर आणि जर्मनप्रीत सिंग करणार एसजी पायपर्सचे नेतृत्व; उपकर्णधारांचीही घोषणा

मोठी बातमी! शाळा बंद आंदोलनातही सुरू होत्या २१६२ शाळा; सोलापूर जिल्ह्यातील १७,८०० शिक्षक शाळा बंद आंदोलनासून राहिले दूर

Mumbai Crime: व्हिसा नसताना भारतात आला, 72 लाखांच्या कोकेनसह पोलिसांनी पकडला

Mephedrone Seized : हडपसरमध्ये मेफेड्रोन विक्री करणाऱ्यास अटक, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT