पुणे

‘विकसित भारत २०४७’वर विचारमंथन

CD

पुणे, ता. १६ ः ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’च्या (बीएआय) पुणे सेंटरतर्फे ‘बिल्डर्स डे’निमित्त ‘विकसित भारत २०४७ : बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्राचे योगदान’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
हॉटेल शेरेटन ग्रँड येथे आयोजित कार्यक्रमात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, संवर्धन मदरसन ग्रुपचे महासल्लागार व वरिष्ठ उपाध्यक्ष अनुभव कपूर, ‘बीएआय’ महाराष्ट्राचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव, पुणे अध्यक्ष अजय गुजर, उपाध्यक्ष महेश मायदेव, उपाध्यक्ष राजाराम हजारे, सचिव सी. एच. रतलानी, कोषाध्यक्ष डॉ. महेश राठी आणि कार्यक्रमाचे संयोजक शिवकुमार भल्ला उपस्थित होते.
‘‘निवारा जेव्हा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचेल, तेव्हा विकसित भारताचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होईल. विकसित भारतामध्ये प्रगत तंत्रज्ञान, बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्राचे मोलाचे योगदान राहणार आहे,’’ असे मत डॉ. भिरूड यांनी केले.
डॉ. भिरूड म्हणाले, ‘‘तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग प्रचंड असून, २०४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करताना, अंतराळप्रवास आणि मंगळ, चंद्र येथील मानवी वसाहतींचा विचार केला जाईल. अधिकाधिक स्मार्ट साधने, स्मार्ट सामग्री असेल. बांधकामासाठी लागणारा वेळ कमी होत जाईल. बांधकाम क्षेत्राची भूमिका अनन्यसाधारण महत्त्वाची राहील, हे निश्चित आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राने सर्वोच्च दर्जाची गुणवत्ता जपावी.’’ ‘बीएआय’ बांधकाम व्यावसायिक, बांधकाम कामगार व त्यांचे मुले यांच्यासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत असल्याचे अजय गुजर यांनी प्रास्ताविकात सांगितले. संजय आपटे यांनी सूत्रसंचालन केले. सी. एच. रतलानी यांनी आभार मानले.
दरम्यान, बांधकाम क्षेत्रातील योगदानाबद्दल अशोक केडगे, लक्ष्मण थिटे, एस. बी. थोरवे, युसूफ इनामदार यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. तसेच संजय बोरकर, गीता नगरकर, अधीरा बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स, एसकेएफजी रिॲलिटी लिमिटेड, विंडसर इन्फ्राकॉन व जयंत इनामदार यांना सदस्यत्व बहाल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambani gifts Lionel Messi : अनंत अंबानींकडून मेस्सीला 11 कोटींचं घड्याळ भेट! एवढं महाग का आहे Richard Mille घडयाळ? काय आहे खास?

Germany Jobs: ‘मेड इन महाराष्ट्र’ मनुष्यबळाला जर्मनीचे दरवाजे बंद? १० हजार तरुणांचे भविष्य टांगणीला

Nashik Marathi Vishwa Sammelan : नाशिकमधील 'मराठी विश्व संमेलन' लांबणीवर; जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत रंगणार सोहळा!

VIDEO : बस चालवत असतानाच चालकाला अचानक आला हृदयविकाराचा झटका; मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रवाशांचे प्राण वाचवले, पण स्वत:...

Kolhapur Circuit Bench : 40 वर्षे लढून मिळवलेल्या कोल्हापूर सर्कीट बेंच विरोधात याचिका, पण एका सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण निकाली

SCROLL FOR NEXT