पुणे

शेतकरी कंपनी नोंदणी सेवा

CD

पुणे, ता. २० : केंद्र तसेच राज्य सरकारद्वारे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालाचे मूल्यवर्धन व मार्केटिंग करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. सिमासेस लर्निंगद्वारे (SIILC) राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी विविध प्रकारच्या सेवा, मार्गदर्शन एक-खिडकी पद्धतीने उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. यापैकी एक सेवा म्हणजे शेतकरी कंपनीची नोंदणी सेवा. कंपनीची नोंदणी योग्य प्रकारे केली गेली, कंपनीचे नियम-पोटनियम हे सर्वसमावेशक, व्यापक व परिपूर्ण अभ्यासाने बनवले गेले तर नोंदणीनंतरच्या सुरूवातीच्या काळातील व्यवसाय तसेच भांडवल उभारणीतील मर्यादा-अडचणी टाळणे शक्य होते, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याची पात्रताही तयार होत राहते. या पार्श्वभूमीवर सिमासेस लर्निंगने अनुभवी सीए, सीएस, कृषी व्यवसाय मार्गदर्शकांच्या माध्यमातून शेतकरी कंपनीची नोंदणी सेवा उपलब्ध केली आहे.
संपर्क : ८९५६७१२६३१

‘लीव्ह अँड लायसन्स’ मास्टरक्लास
मालमत्ता भाड्याने देताना आजकाल बहुतांश लोक ‘रेंट’ किंवा ‘लीज’ कराराऐवजी ‘लीव्ह अँड लायसन्स’ पद्धत पसंत करत आहेत. या प्रक्रियेतून मालकाचे हक्क सुरक्षित राहतात आणि भाडेकरूस तात्पुरते निवास किंवा व्यावसायिक वापराचे अधिकार मिळतात. मात्र, योग्य करारनामा तयार करणे, कागदपत्रांची पूर्तता, स्टॅम्प ड्यूटी व नोंदणी शुल्काची गणना, शासकीय पोर्टलवर फी भरणे, बायोमेट्रिक प्रक्रिया, तसेच पोलिसांना कळविणे हे सर्व टप्पे तांत्रिक ज्ञानाशिवाय अवघड ठरू शकतात. याचसाठी याबाबत मार्गदर्शन करणारा मास्टरक्लास २२ डिसेंबरला आयोजिला आहे. यामध्ये प्रत्यक्ष डेमोसह करार तयार करण्यापासून ते ग्राहकाला मंजूर प्रत सुपूर्द करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया शिकवली जाणार आहे. तसेच, ११ महिन्यांच्या कराराची नोंदणी बंधनकारक का आहे, कोणती कागदपत्रे लागतात, पोलिस इंटिमेशनचे महत्त्व आणि सरकारमान्य स्वरूपांचा वापर याबाबतही माहिती दिली जाणार आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५, ७३५०००१६०२

औषधी वनस्पती लागवड ऑनलाइन कार्यशाळा
आयुर्वेदिक व सेंद्रिय उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी जास्त असल्याने गेल्या काही वर्षात औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीची गरज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वनौषधींची लागवड पद्धतीविषयी मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा २२ डिसेंबरला आयोजिली आहे. यामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीचे महत्त्व आणि व्याप्ती, वनौषधी व सुगंधी वनस्पतींचे शेतजमिनीला होणारे फायदे, वनस्पती लागवडीचे तंत्र, नर्सरीचे तंत्र, व्यावसायिकदृष्ट्या लागवडीच्या पद्धती, औषधी वनस्पतींची प्राथमिक प्रक्रिया आणि मूल्यवर्धन, लागवड व प्रक्रिया उद्योगासाठीच्या सरकारी योजना, मार्केटिंगसाठी असणारा वाव आदींविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७

युट्युबर होण्यासाठी प्रमाणपत्र प्रशिक्षण
‘बिकम अ सर्टिफाईड युट्युबर’ ही चार दिवसांची कार्यशाळा २७ व २८ डिसेंबर तसेच ३ व ४ जानेवारीला आयोजिली आहे. ज्यांना युट्यूब व इतर माध्यमांद्वारे कंटेंट क्रियेटर व्हायचे आहे अथवा जे आधीच असे क्रियेटर आहेत त्यांना स्वतःची पोहोच वाढवायची आहे अशांना ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. वास्तविक उदाहरणे, प्रात्यक्षिकाद्वारे शिकविण्यावर असलेला भर आणि एआयचा उपयोग हे कार्यशाळेचे वैशिष्ट्य आहे. युट्युबद्वारे कमाई, चॅनेल कसे तयार करावे, कथा व पटकथांचे लेखन कसे करावे, कॅमेरा, ध्वनी, प्रकाशयोजना आणि संकलनाचे तंत्र वापरून चांगला कंटेंट कसा तयार करता येईल याचे उपयुक्त मार्गदर्शन कार्यशाळेत होणार आहे. सोबतच युट्युब विश्लेषण, लघुपट निर्मिती, निर्मितीपूर्व कामे, निर्मितीनंतरची कामे, मार्केटिंग, एसईओ व अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचे विविध तांत्रिक मार्ग, हक्क आणि कायदेशीर बाबी आदींबद्दलही मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

Marathwada News : “साहेब, आम्हाला पण भीती वाटते!” पीक वाचवायचं की जीव; निल्लोड परिसरात अंधारात गहू भरणी करताना शेतकरी धोक्यात!

SCROLL FOR NEXT