हाउसकिपिंग सेवांची वाढती मागणी लक्षात घेऊन व्यावसायिक सेवा व स्वतंत्र व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण २७ व २८ डिसेंबर रोजी आयोजिले आहे. प्रशिक्षणात हाउसकिपिंग क्षेत्रातील मूलभूत संकल्पना, प्रत्यक्ष कामाचे तंत्र आणि व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक कौशल्ये, हाउसकिपिंग क्षेत्राची ओळख, स्वच्छतेचे विज्ञान व मानक पद्धती, वापरली जाणारी साधने व उपकरणे, घरगुती तसेच कार्यालयीन आणि व्यावसायिक हाउसकिपिंगचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, सॉफ्ट स्किल्स, ग्राहक संवाद, हाउसकिपिंग व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, टेंडर प्रक्रिया, कोटेशन व प्रस्ताव तयार करण्याची पद्धत, तसेच मार्केटिंग व ग्राहक मिळवण्याचे मार्ग, गुणवत्ता नियंत्रण, ग्राहक टिकवून ठेवण्याची तंत्रे आणि व्यवसाय वाढ व कमाईचा आराखडा आदी बाबींवर सविस्तर मार्गदर्शन होणार आहे. प्रशिक्षणातून सहभागी उमेदवारांना हाउसकिपिंग ऑपरेशन, स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी आदी बाबींची माहिती होईल.
प्रात्यक्षिकासह शिका फरसाण व स्नॅक्स
स्वादिष्ट व चमचमीत असे २० विविध प्रकारचे व्यावसायिक फरसाण व स्नॅक्स प्रात्यक्षिकासह शिकवणारे प्रशिक्षण २७ व २८ डिसेंबर रोजी होणार आहे. प्रशिक्षणामध्ये फरसाण तयार करण्याची व्यावसायिक पद्धत व त्या अनुषंगाने त्याला लागणारे विविध प्रकारचे ड्राय स्नॅक्सचे प्रकार शिकवले जाणार आहेत. त्याचप्रमाणे या व्यवसायाची स्वरूप, कॉस्टिंग, ब्रॅण्डिंग, पॅकिंग, लेबलिंग विविध प्रकारचे प्रिझर्वेशन, लायसनिंग कॉस्ट, प्रॉडक्शन कॉस्ट अशी सर्व प्रकारची व्यावसायिक माहिती दिली जाणार आहे. व्यवसायासाठी लागणारी मशिनरी, त्याचे कॉस्टिंग, प्रोजेक्ट रिपोर्ट, शासकीय योजना आदींबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. प्रशिक्षणात व्यावसायिक फरसाण, शेव, पापडी, गाठीया, खरी बुंदी, पुदिना शेव, लसूण शेव, पालक शेव, मका चिवडा, शाबू चिवडा, बटाटा चिवडा, डाएट चिवडा, ड्राय सामोसा, ड्राय कचोरी, चिलीमिली, सोया स्टीक्स, स्टिक चकली, बटर चकली, पालक चकली, दालमोठ इत्यादी पदार्थ प्रात्यक्षिकासह शिकता येतील.
व्यावसायिक चटणी कार्यशाळा
जेवणातील चव वाढविणाऱ्या खमंग स्वादिष्ट आणि रुचकर अशा विविध पद्धतीच्या महाराष्ट्रीय चटणी प्रात्यक्षिकासह शिकवणारी कार्यशाळा ४ जानेवारी रोजी आयोजिली आहे. रोजच्या आहारामध्ये चटण्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला मोठे फायदे होतात. या अनुषंगाने कार्यशाळेत सोलापुरी शेंगदाणा, खोबरे, लसूण, कढीपत्ता, कारले, टोमॅटो, कांदा, पांचाली, थ्री इन वन, आवळा, कोर्टा, जवस आशा विविध प्रकारच्या चटण्या तसेच दक्षिण भारतीय इडली, भात इ.सोबत खाल्ली जाणारी गन पावडर शिकवली जाणार आहे. व्यावसायिक कार्यशाळा असल्याने यामध्ये चटणी व्यवसाय कमी भांडवलामध्ये कसा सुरु करावा, व्यवसायाला असणारी मागणी, त्यामधील नावीन्यपूर्ण पद्धती, मिळणारा नफा चटणी टिकवण्याची पद्धत व पॅकेजिंग याबद्दलही माहिती दिली जाणार आहे.
जुन्या इमारतींचा पुनर्विकास (रीडेव्हलपमेंट)
यूडीसीपीआर नियमामुळे महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या इमारतींचा पुनर्विकास (रीडेव्हलपमेंट) सुरु आहे किंवा होणार आहे. हा नियम काय आहे? त्यामुळे एफएसआय कसा व किती वाढला? त्याचा वापर कसा करायचा? फिसिबिलीटी रिपोर्ट कशासाठी काढतात? पी. एम. सी म्हणजे काय? आदींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा ४ जानेवारी रोजी आयोजिली आहे. यामध्ये इमारतींचा पुनर्विकास करण्याची पद्धत, त्यासाठीचे पेपर्स, विकसक कसा निवडावा, जुन्या सभासदांना होणारे फायदे, करारनामा कसा करावा, महारेरा रजिस्ट्रेशन आदी सर्व मुद्यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे. सोसायटी स्वयंपुनर्विकास करू इच्छिणारे, नवीन विकसक, ज्यांना रीडेव्हलपमेंट क्षेत्रात रस आहे असे सार्वजण, रिअल इस्टेट एजंट यांच्यासाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.