पुणे

खरेदीतून व्यक्त होतोय पुणेकरांचा सण!

CD

श्रावणमासी...हर्षमानसी...खरेदीचा उत्साह चोहीकडे
---------------------------------
हिंदू पंचांगानुसार श्रावण हा अत्यंत पवित्र व धार्मिक महिना मानला जातो. विशेषतः महाराष्ट्रात त्याचे खास महत्त्व असून, श्रावणाच्या आगमनाने उत्सव, व्रते, उपवास, पूजाअर्चा, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होते. यात नागपंचमी, मंगळागौरी, हरितालिका तृतीया, श्रावणी सोमवार, रक्षाबंधन, गोपाळकाला यासारखे सण आल्यामुळे घराघरांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. या सणांसाठी बाजारपेठाही सजल्या असून, खरेदीसाठी नागरिकांची पावले पडत आहेत.
- राधिका वळसे पाटील
----------
श्रावणात विशेषतः मंगळागौरीसाठी, नागपंचमीसाठी पारंपरिक साड्यांची व चोळी-कुर्त्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. नऊवारी साडी, पैठणी, कांजीवरम, तसेच हलकी वजनाची सिल्क व कॉटन साड्यांची मागणी वाढते. त्यासोबतच मुलींसाठी ट्रेंडी सलवार कमीज, कुर्ती आणि प्लाझोचा पर्यायही लोकप्रिय ठरतो. तर पुरुषांमध्ये धोतर, कुर्ता, नेहरू जॅकेटसारख्या पारंपरिक पोशाखांची विक्री वाढते. अनेक नामांकित ब्रँड्सनीही श्रावणानिमित्त सवलती जाहीर केल्या असून, यामुळे ब्रँडेड कपड्यांच्या स्टोअर्समध्ये देखील गर्दी वाढली आहे. शहरातील लक्ष्मी रोड, टिळक रोड, तुळशीबाग येथे नागरिकांची लगबग असल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे श्रावणात सणांमुळे सोसायट्यांमध्ये ‘थीम ड्रेस कोड्स’ ठरवले जातात. त्यामुळे श्रावणी सोमवारी पांढऱ्या कपड्यांचे थीम, मंगळागौरी – पारंपरिक साडी, पैठणी, नऊवारी साड्या तर रक्षाबंधनाला इंडो- वेस्टर्न, शरारा, थ्री पीस सूट, अनारकली, लेहेंगा, अशा वेगवेगळ्या संकल्पना ग्राहक खरेदी करताना लक्षात घेतात.
---
दागिन्यांची खरेदी
श्रावणमास, रक्षाबंधन, गणेशोत्सव आणि नवरात्र यांच्या पार्श्वभूमीवर दागिन्यांची खरेदी चांगलीच पाहायला मिळत आहे. नथ व झुंबर, मोत्याचे दागिने तर बांगड्यामध्ये काचबांगड्या, धातूच्या बांगड्या, गोल्ड प्लेटेड बांगड्या यांची मागणी वाढली आहे.
त्यात सणासुदीनिमित्त विशेष सेट्स उपलब्ध आहेत. त्यात मंगळागौर साज ( नथ, झुंबर, ठुशी, गजरा, कंबरपट्टा आणि पारंपरिक पैंजण यांसारख्या दागिन्यांचा सजवलेला साज) गोंधळ आणि हरिपाठ कार्यक्रमांसाठी दागिने ( गोंधळी नथ, मोठे चंद्रकुंतल, बोरमाळा, पारंपरिक हाता-पायांचे अलंकार ) रक्षाबंधनानिमित्त राखी गिफ्ट्स – महिलांकडून भावासाठी सोन्याची किंवा चांदीची राखी, स्लीम ब्रेसलेट देण्याचा नवा ट्रेंड आहे. सणासुदीच्या निमित्ताने हिऱ्यांचे दागिने घेण्याकडे देखील नागरिकांचा कल आहे. त्यात सिंगल डायमंड नथ, झिरकॉन सेट्स, लहान सोलिटेअर पेंडंट्स, स्टड्स यांची मागणी शहरातील ब्रँडेड ज्वेलर्स तसेच सोन्यासारखे सौंदर्य व बजेटमध्ये बसणारे एक ग्रॅम सोन्याची लोकप्रियता देखील अधिक आहे. पारंपरिक सोनं महाग झाल्याने त्याचा पर्याय म्हणून एक ग्रॅम सोन्याचे दागिने महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहेत.
आजकाल अनेक ग्राहक कस्टमाइज्ड ज्वेलरी मागतात. नाव, राशीचे चिन्ह, अक्षर असलेली पेंडंट्स किंवा फोटो लावलेली लॉकेट्स यांना मागणी आहे. सणांशी संबंधित दागिन्यांचे ट्रेंड आहे. फहूल (हातात घालण्याचे सजावटी फुलांचे किंवा धातूचे पट्टे) स्त्रिया श्रावणात नित्य नवे वापरणे पसंत करतात. हे प्लास्टिक, मेटल, ऑक्सिडाइज्ड, आणि गोंधळी फहूल या प्रकारांमध्ये येतात. ऑक्सिडाइज्ड झुमके व चोकर सेट – पारंपरिक पोशाखांवर शोभून दिसणारे झुमके आणि चोकर कॉलेज तरुणींमध्ये खूप प्रसिद्ध आहेत.
-------
घर सजवण्यासाठी खरेदीला वेग
श्रावण महिन्याच्या निमित्ताने घरामध्ये शुद्धता, सजावट आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होते. त्यामुळे या काळात गृहोपयोगी वस्तूंची मागणी जास्त असते. त्यात पारंपरिक तोरणे, समया, पूजेच्या घंटा, फुलदाण्या, सजावटीचे आरसे, रांगोळी स्टेन्सिल, कपडे ठेवण्यासाठी स्टोरेज बॉक्सेस, शो-पिसेस, घरगुती दीपमाळा, तसेच डेकोरच्या दुकानांमध्ये आणि होम स्टोअर्समध्ये श्रावण स्पेशल डिस्काउंट ऑफर्स जाहीर करण्यात आल्या असून, लाकडी पाट, पूजा चौरंग, डिझायनर आरती थाळी, अगरबत्ती स्टँड यासारख्या वस्तूंची विक्रीही चांगली होत आहे. काही गृहिणी या काळात किचनसाठी स्टील भांडी, तांबे-पितळी पात्रं, तसेच नवीन कुकर, ताट-चमच्यांचे सेट यांचीही खरेदी करतात.
-------

ऑनलाइन खरेदीचा ट्रेंड
अनेक नागरिक गर्दीपासून दूर राहण्यासाठी, घर बसल्या खरेदीचा आनंद घेण्यासाठी तसेच जास्तीत जास्त सवलतींसह पर्याय उपभोगण्याकरता ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत आहेत. मिंत्रा, अमॅझॉन, मिशो, फ्लिपकार्ट, आजीओ, यांसारख्या प्लॅटफॉर्मवर श्रावण विशेष सेल सुरू आहेत. पूजा किट्स, पारंपरिक कपडे, रक्षाबंधनासाठी राख्या, ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी हे सर्व ‘ऑर्डर ऑन
क्लिक’ स्वरूपात मिळत आहे.
-------
पूजेसाठी साहित्य
श्रावणात उपवास, व्रते आणि पूजांचा ओघ वाढतो. यामुळे पूजेसाठी लागणारे साहित्य, फुले, धूप, दीप, शुद्ध तूप, नारळ, तुळशीच्या माळा, बेलपाने, हार, अक्षदा , सुपारी, कुंकू, हळद, निरंजन, पूजा पाठ संग्रह यांची मागणी वाढते. पुण्यातील मंडई, तुळशीबाग, मार्केट यार्ड, रविवार पेठ, येथे फुलांची तसेच पूजेच्या साहित्यांची चांगली उलाढाल सुरू आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यापाऱ्यांनी पर्यावरणपूरक गणपती मूर्ती, शिवलिंग, तसेच ‘पूजा साहित्याची किट्स’ तयार केली आहेत, ते ५० ते १५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यात संपूर्ण पूजेसाठी लागणारे साहित्य एका किटमध्ये मिळते.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates: प्रांजल खेवलकरच पार्टीचे आयोजक - महाजन

Women's Chess World Cup : दिव्या-हंपी पहिला डाव बरोबरीत, महिला विश्वकरंडक बुद्धिबळ; दोघींनीही वर्चस्वाची संधी गमावली

Nagpanchami Special Recipe: नागपंचमीला घरच्या घरी बनवा पौष्टिक ज्वारीच्या लाह्या, लगेच लिहून घ्या रेसिपी

प्लीज वाचवा! बँकेतून ९ लाख काढताच तरुणाचं कारमधून अपहरण, २ किमीवर फेकून दिलं; मदतीसाठी ओरडताना बघ्यांनी VIDEO काढला

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT