पुणे

धावपट्टीजवळ तीन मोरांचा वावर पुणे विमानतळावरील घटना ः प्रशासन मात्र अनभिज्ञ

CD

पुणे, ता. २६ ः बिबट्या, कुत्र्यांनंतर आता पुणे विमानतळाच्या धावपट्टीजवळ मोरांचा वावरदेखील आढळून आला. शनिवारी पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या (एसजी-९६७) विमानाच्या प्रवाशाने धावपट्टीपासून काही मीटरवर तीन मोरांना गवताळ भागात वावरताना पाहिले. विमान टॅक्सी वेवरून धावपट्टीच्या दिशेने जाताना त्यांनी हे दृश्य पाहिले आहे. मोरांसारखा मोठा पक्षी धावपट्टीजवळ आढळून आल्याने पुन्हा एकदा प्रवासी सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. हे पक्षी धावपट्टीवर दाखल झाले तर विमान व प्रवासी यांची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुणे विमानतळावर शनिवारी सकाळी सात वाजून २० मिनिटांच्या सुमारास पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात बाणेर येथील गौरव चत्तुर हे प्रवास करीत होते. विमान टॅक्सी वेवरून धावपट्टीच्या दिशेने जात असताना खिडकीतून तीन मोरांना त्यांनी पाहिले. हे मोर धावपट्टीपासून काहीच मीटर अंतरावर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. धावपट्टीच्या जवळ मोठ्या प्रमाणात गवताळ भाग आहे. त्यामुळे येथे मोरांचा वावर अधिक असल्याचे आढळून आले. पुणे विमानतळावर आतापर्यंत कुत्रा, बिबट्या, रानमांजर, ससे आणि आता मोर आढळून आले आहेत. यामुळे विमानसेवेच्या सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.
------------------
‘‘शनिवारी मी सकाळी पुण्याहून दिल्लीला जात होतो. त्यावेळी धावपट्टीजवळ मला तीन मोर आढळून आले. हे हवाई दलाचे बेस स्टेशन असल्याने फोटो काढला नाही. मात्र, याची माहिती विमानतळ प्रशासनाला मिळावी म्हणून एक्सवरून माहिती दिली. माझ्या एक्सवरील पोस्टनंतर विमानतळ प्रशासनाकडून कोणताही संपर्क साधण्यात आलेला नाही.
गौरव चत्तुर, प्रवासी
-----------
‘‘या घटनेची माहिती नाही. शिवाय पुणे विमानतळाची धावपट्टी ही हवाई दलाच्या अखत्यारीत येते. त्यामुळे याबाबत त्यांनाच अधिक माहिती असणार आहे.
संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT