पुणे

एकाच नाटककाराची तीन जुनी नाटके नव्या संचात

CD

पुणे, ता. ३० ः जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन करून नव्या संचात त्याचे प्रयोग सादर करण्याची परंपरा मराठी रंगभूमीसाठी नवी नाही. मात्र एकाच नाटककाराची तीन जुनी नाटके नव्या संचात सादर होत असल्याचा योग जुळून आला आहे. ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांची तीन जुनी नाटके सध्या नव्या संचात सादर होत असून, त्यांच्याच एका नव्या नाटकाचेही प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे नव्या पिढीतील रंगकर्मींना आळेकर यांच्या नाटकांची भुरळ पडल्याचे दिसते आहे.
आळेकर हे साठोत्तरी मराठी रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाटककार. १९७०-८० च्या दशकात त्यांनी लिहिलेल्या ‘मिकी आणि मेमसाब’, ‘महापूर’, ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’ अशा अनेक नाटकांचे सातत्यपूर्ण प्रयोग झाले. खास ‘आळेकरी’ शैलीतील ही नाटके. यातील ‘महानिर्वाण’ या नाटकाला गतवर्षी ५० वर्षे पूर्ण झाली; तर ‘महापूर’ या नाटकाचा यंदा सुवर्ण महोत्सव आहे आणि ‘अतिरेकी’ या नाटकाला ३६ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र या ही तीन जुनी नाटके आणि ‘ठकीशी संवाद’ हे नवीन, अशा चार नाटकांचे प्रयोग सध्या सुरू आहेत. यातील चारपैकी तीन नाटकांचे दिग्दर्शक नव्या पिढीचे आहेत. तसेच, प्रत्येक नाटकातील कलाकारही नव्या पिढीतील आहेत.
‘नाटक कंपनी’ या संस्थेतर्फे ‘महानिर्वाण’ हे नाटक २०१८ पासून नव्या संचात सादर केले जात आहे. याचे दिग्दर्शन आळेकर यांनीच केले असून, कलाकार मात्र सारे नव्या पिढीतील आहेत. ‘महापूर’ हे नाटक सुवर्ण महोत्सवी वर्षात पुन्हा रंगभूमीवर आले असून, ‘वाइड विंग्ज मीडिया’ने याची निर्मिती केली आहे. तरुण दिग्दर्शक ऋषी मनोहर याने या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.
‘अतिरेकी’ हे असेच आळेकरी शैलीतील एक महत्त्वाचे नाटक. लेखक-दिग्दर्शक प्रदीप वैद्य यांनी ‘द बॉक्स’च्या पुनर्भेट उपक्रमांतर्गत या नाटकाचे नव्या संचात प्रयोग सुरू केले आहेत. ‘द बॉक्स’ आणि ‘एक्स्प्रेशन लॅब’ यांची निर्मिती असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन वैद्य यांनी केले आहे. ‘ठकीशी संवाद’ या यातील सर्वात अलीकडचे नाटक असून, गतवर्षी या नाटकाच्या प्रयोगांना सुरुवात झाली. ‘राखाडी स्टुडिओ’ची निर्मिती असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन अनुपम बर्वे यांनी केले आहे.

मी तरुणपणीच लिहायला सुरुवात केली; त्यामुळे नाटकाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतरही त्याचे नव्या संचात प्रयोग मला पाहता येत आहेत. त्याअर्थी मी नशीबवान आहे. ही नाटके समकालीन वाटतात का, ती आजही का पाहावीशी वाटतात, हे खरेतर प्रेक्षकच सांगू शकतील. मात्र पंचाहत्तरी उलटून गेलेल्या नाटककाराची ५० वर्षांपूर्वी लिहिलेली नाटके अजूनही लोकांना पाहावीशी वाटतात, यासाठी मी आनंदी आणि समाधानी आहे.
- सतीश आळेकर, ज्येष्ठ नाटककार

पन्नास वर्षांपूर्वी ‘महापूर’ या नाटकातील मध्यवर्ती भूमिका मोहन गोखले यांनी केली होती, आता ती साकारण्याची संधी मला मिळते आहे. गेल्या १५ वर्षांपासून हे नाटक करावे, असे माझ्या मनात घोळत होते. आळेकरांच्या नाटकातील भावनांची तीव्रता, पात्रांच्या तोंडी असणारे थेट संवाद आणि लिखाणाची खास ‘आळेकरी’ शैली, ही मला भावते. त्यामुळे त्यांच्या एखाद्या नाटकात काम करण्याची इच्छा होतीच. ती यानिमित्ताने पूर्ण झाल्याचा आनंद आहे.
- आरोह वेलणकर, अभिनेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात वाढ, सोनं ४३० रुपयांनी महागलं, आजचे दर काय? जाणून घ्या...

उत्तर प्रदेशात जातीवर आधारित रॅलींवर बंदी; सरकारी कागदपत्रांमधूनही हटणार जातीचा कॉलम, High Court च्या आदेशानंतर ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News live Updates : भुजबळांच्या हस्ते घटस्थापना होऊन देवीचे घेतले दर्शन

Flight Safety Tips: टेकऑफ-लँडिंगवेळी एअर होस्टेस खिडकीचे शेड्स का उघडायला सांगतात? जाणून घ्या यामागचं खरं कारण

Navaratri 2025 Zodiac Mantras: दुर्गा देवीचे 12 राशींसाठी खास मंत्र, वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT