पुणे

व्हायोलिन वादनाची उद्या अनोखी मैफल

CD

पुणे, ता. ३१ : ‘सुझुकी स्कूल ऑफ व्हायोलिन’च्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेजच्या सभागृहात शनिवारी (ता. २) सायंकाळी पाच वाजता होणार आहे. यावेळी १०० हून अधिक विद्यार्थी व्हायोलिन वादनाची अनोखी मैफल सादर करणार आहेत.
या कार्यक्रमात पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतापासून लोकप्रिय बॉलिवूड गाणी आणि भारतीय रागसंगीतापर्यंतचा सुरेल प्रवास अनुभवता येईल. गेल्या २५ वर्षांपासून रमा चौबे व्हायोलिन या वाद्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी अथक प्रयत्न करत आहेत. सुझुकी स्कूल ऑफ म्युझिकने पुण्याला आणि जगाला ५०० हून अधिक तरुण आणि प्रतिभावान व्हायोलिनवादक दिले आहेत. लहान मुलांमध्ये विशेषतः तीन वर्षांच्या मुलांमध्ये संगीताची आवड निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या शाळेची स्थापना केली होती. सुझुकी पद्धतीचा अवलंब करून, या शाळेने केवळ तांत्रिक कौशल्येच नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये संगीताची सखोल संवेदनशीलता वाढवली आहे. शाळेचे अनेक माजी विद्यार्थी आता जगभरातील नामांकित ऑर्केस्ट्रामध्ये आपली कला सादर करत आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. संगीतप्रेमी आणि संगीत शिकू इच्छिणाऱ्यांसाठी हा कार्यक्रम संगीतामधील संस्कार, शिस्त आणि सौंदर्याचा अनुभव देणारा ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dussehra Melava 2025 Live Update: संपूर्ण कर्जमुक्ती केल्याशिवाय निवडणुकीची तारीख जाहीर करु देणार नाही- जरांगे पाटील

Mangalwedha Farmers : स्वतःचे नुकसान बाजूला ठेवत सरकारलाच 15 रुपये मदतनिधी पाठवला

Kolhapur Crime : उसणे घेतलेल्या पैशांची चिंता, लोकांना तोंड कसं दाखवायचं; २७ वर्षीय तरूणाने घेतला गळफास, 'त्या' चिठ्ठीत नेमकं काय?

शिवचरित्राची थरारक कहाणी रुपेरी पडद्यावर, ‘रणपति शिवराय – स्वारी आग्रा’ 19 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला!

Manoj Jarange Patil: ''आरक्षण घेऊन बोगस लोक खुर्चीवर बसले आहेत'', जरांगे पाटलांचं दसरा मेळाव्यात मोठं विधान

SCROLL FOR NEXT