पुणे

कीटकजन्‍य आजारांच्या रुग्‍णसंख्‍येत ६० टक्‍क्‍यांनी घट

CD

पुणे, ता. ५ : खासगी रुग्‍णालयांच्‍या घेतलेल्‍या बैठका, गेल्या वर्षी आढळलेल्‍या संशयित रुग्‍णांच्‍या ठिकाणी केलेले सर्वेक्षण, तलावात सोडलेले गप्‍पी मासे, धूर फवारणी, कीटक प्रतिबंधात्‍मक औषधांची फवारणी व शाळांमध्‍ये जाऊन केलेली जनजागृती या उपाययोजना महापालिकेच्‍या आरोग्‍य विभागाच्‍या कीटक प्रतिबंधक विभागाने अवलंबिल्या. या उपाययोजनांमुळे गेल्या वर्षीच्‍या तुलनेत यावर्षी जानेवारी ते जुलैदरम्‍यान कीटकजन्‍य आजारांची रुग्‍णसंख्‍या सुमारे ६० ते ६५ टक्‍क्‍यांनी घटली आहे.
डेंगी, चिकूनगुनिया, मलेरिया हे कीटकजन्‍य आजार आहेत. दर वर्षी खास करून पावसाळ्यात या रुग्‍णांची संख्‍या वाढते. गेल्‍या वर्षी जानेवारी ते जुलैपर्यंत डेंगीचे संशयित रुग्‍ण ६३६ तर निश्‍चित निदान झालेले ३४ रुग्‍ण आढळले होते. या वर्षी अनुक्रमे ही संख्‍या २३३ व ११ वर आली आहे, तर चिकूनगुनियाची रुग्‍णसंख्‍या गेल्‍या वर्षी याच कालावधीत २४ होती, तर ती आता दोन आहे. मलेरियाचा मात्र एक रुग्‍ण होता, ती संख्‍या दोन झाली आहे. यावरून रुग्णसंख्या निश्‍चितच कमी झाल्‍याचे दिसून येत आहे.
प्रत्‍येक तापाच्या रुग्‍णांना मलेरिया आहे का, याचे निदान करण्‍यासाठी त्‍यांच्‍या रक्‍ताचे नमुने घेतले जात आहेत. महापालिकेच्‍या सर्व दवाखान्‍यांत ही सुविधा आहे, तसेच काही रक्‍त चाचण्‍यादेखील मोफत करण्‍यात येत आहेत.

या केल्‍या उपाययोजना
- गेल्या वर्षी जेथे डेंगीचे संशयित रुग्‍ण आढळले तेथे अधिक लक्ष ठेवले
- खासगी रुग्‍णालयांसोबत बैठका घेऊन रुग्‍णांबाबत माहिती देण्‍याच्‍या सूचना दिल्‍या
- मोठ्या पाणीसाठ्यात गप्पी मासे सोडले, कीटक प्रतिबंधात्‍मक लिक्विड टाकले
- वाहन डेपो, १५ क्षेत्रीय कार्यालये येथे माहितीची शिबिरे घेतली
- शाळा, महाविद्यालयांत जनजागृती, संशयित रुग्‍णांच्‍या ठिकाणी वाहनांद्वारे धूर फवारणी

यावर्षी कीटकजन्‍य आजारांची संख्‍या घटली आहे. कारण त्‍याबाबतीत सूक्ष्म नियोजन करून अंमलबजावणी केली आहे. महत्त्वाच्या जागांवर २६५ कंत्राटी कर्मचाऱ्यांद्वारे धूर फवारणी, कीटक प्रतिबंधात्‍मक फवारणी करण्‍यात येत आहे, तर ताप असलेल्‍या रुग्‍णांना मलेरियाचे निदान करण्‍यासाठी नमुने घेण्‍याबाबत आशा सेविकांचे प्रशिक्षण घेतले आहे. बसस्थानकावर जनजागृती करण्‍यासाठीच्‍या परवानगीबाबत आयुक्‍तांकडे प्रस्‍तावही पाठवला आहे. एकंदरीत सामूहिक प्रयत्‍नांमुळे ही रुग्‍णसंख्‍या घटली आहे.
- डॉ. राजेश दिघे, प्रमुख, कीटक प्रतिबंधात्‍मक विभाग, पुणे महापालिका

जानेवारी ते जुलै तुलनात्‍मक रुग्‍णसंख्‍या
वर्ष – संशयित डेंगी – निदान झालेले डेंगी रुग्‍ण – चिकूनगुनिया – मलेरिया
२०२४ – ६३६– ३४ – २४ – १
२०२५ – २३३ – ११ – २ – २

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK, Asia Cup: अभिषेक शर्मा - शुभमन गिलच्या वादळाने पाकिस्तानचा उडवला धुव्वा; भारताचा सुपर फोरमध्ये पहिला विजय

IND vs PAK: पाकिस्तानी फलंदाजाचं फिफ्टीनंतर गनफायर सेलिब्रेशन अन् मग टीम इंडियानं विजयानंतर हँडशेकसाठी इग्नोर करत दिलं उत्तर

Video: IND vs PAK सामन्यात ड्रामा! शुभमन गिल - अभिषेक शर्माला आफ्रिदी-रौफ भिडले, मग भारतीय सलामीवीरही पाकिस्तानला नडले

IND vs PAK, Video: सुर्यकुमार यादवचा जुगाड! 'गार्डन'मध्ये फिरणाऱ्या पाकिस्तानी फलंदाजाला चतुराईने केले बाद

IND vs PAK Video: दोनदा चूक झाली, पण तिसऱ्यांदा अफलातून कॅच घेत अभिषेक शर्माची गर्जना; आक्रमक खेळणारा सैम आयुब कसा झाला आऊट?

SCROLL FOR NEXT