सोमेश्वरनगर, ता. १५ : सोमेश्वर साखर कारखान्याच्या चालू ऊस लागवड हंगामात आडसाली लागवड ६८०० हेक्टर इतकी समाधानकारक झाली आहे. मात्र, त्यानंतरची पूर्वहंगामी लागवड निम्म्यावरच म्हणजे १९०० हेक्टरवर आली आणि सुरू लागवडीलाही पुरेसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर तुटणाऱ्या उसाचा खोडवा शेतकऱ्यांनी राखावा, यासाठी व्यवस्थापनास आटोकाट प्रयत्न करावे लागणार आहेत, अन्यथा आगामी गाळप हंगामात पुन्हा ऊस अपुरा पडण्याची शक्यता आहे.
सोमेश्वर कारखाना विस्तारीकरणानंतर उच्च तांत्रिक क्षमतेमुळे दैनंदिन साडेनऊ हजार टन प्रतिदिन क्षमतेने गाळप करत आहे. किमान १५० ते १६० दिवस कारखाना चालवला आणि १४ लाख टन गाळप झाले, तर आर्थिकदृष्ट्या हंगाम परवडतो आणि शेतकऱ्यांनाही चार रुपये अधिकचा दर देता येतो. म्हणजेच स्वतःचा तेरा ते साडेतेरा हजार हेक्टर (३२ ते ३४ हजार एकर) ऊस हवा आहे.
चालू २०२५- २६ या गाळप हंगामासाठी साडेबारा लाख टन एवढाच ऊस उपलब्ध असल्याने गेटकेन आणावा लागत आहे. आगामी २०२६-२७ हंगामात पुन्हा १४ लाख टन गाळप करणे जिकिरीचे होणार आहे, कारण आडसाली लागवड चांगली झाली आहे, मात्र पूर्वहंगामी व सुरू लागवड घटली आहे. चालू लागवड हंगामात चांगला पाऊस झाल्याने १ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत आडसाली लागवड ६८०० हेक्टर (१७ हजार एकर) इतकी समाधानकारक झाली. मात्र, दरवर्षी ३ ते ३.५ हजार हेक्टर इतकी असणारी पूर्वहंगामी लागवड (१ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर) चालू हंगामात फक्त १९०० हेक्टरच्या आसपास झाली आहे. सुरू हंगाम (१ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी) आता सुरू झाला असून, नीरा ते सासवड आणि अंजनगाव ते सुपे- मोरगाव पट्ट्यात तालुक्यात थोड्याफार सुरू लागवडी होत आहेत. अन्यत्र प्रतिसाद नाही. त्यामुळे दरवर्षी १.५ ते २ हजार हेक्टर असणारी सुरू लागवडही यावर्षी घटणार आहे. यावर उत्तम पर्याय म्हणजे, शेतकऱ्यांनी आता तुटणाऱ्या उसाचा चार ते साडेचार हजार हेक्टर खोडवा राखला, तर सोमेश्वरला पुरेसा ऊस उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे उसाचे खोडवे ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे लागणार आहे. तसेच यापुढील काळात आडसालीकडून पूर्वहंगामी व सुरू लागवडीकडे आणि शाश्वत उसासाठी ‘एआय’ ऊसशेतीकडे शेतकऱ्यांना वळवावे लागणार आहे.
शेती अधिकारी बापूराव गायकवाड म्हणाले, ‘‘आडसाली लागवड वाढल्याने पूर्वहंगामी लागवडीत घट झाली आहे. त्यामुळे १२ ते १३ हजार एकर खोडवा राखावा, यासाठी प्रयत्नशील आहोत.’’
गाळप हंगाम २०२०-२१ २०२१-२२ २०२२-२३ २०२३-२४ २०२४-२५ २०२५-२६
उपलब्ध ऊस ११४९८ १२१५९ १२७०६ १४७४९ १२००३ १२००० (अंदाजे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.