सोमेश्वरनगर, ता. २७ : शेंडकरवाडी (ता. बारामती) येथील सामाजिक कार्यकर्ते राजकुमार जगन्नाथ धुर्वे (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार विवाहित भाऊ, भावजया असा मोठा परिवार आहे. करंजेपूलचे फळविक्रेते अर्जुन धुर्वे व पिंपरी चिंचवडमधील उद्योजक चांगदेव धुर्वे हे त्यांचे बंधू होत. सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असे.