समर्थ ग्रंथालयाचे
येणपेत उद्घाटन
उंडाळे, ता. २७ ः येणपे (ता. कऱ्हाड) येथे समर्थ ग्रंथालय उद्घाटन व कृतज्ञता सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात झाला. ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या उभारणीत मोलाचे योगदान देणारे जिंती येथील शिवाजीराव पाटील व दिनकरराव पाटील यांच्या सेवांचा गौरव झाला.
समर्थ प्रतिष्ठान, मुंबई यांच्या सौजन्याने व अध्यक्ष दिनकर जाधव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम झाला. कार्यक्रम यशस्वितेसाठी पांडुरंग जाधव, शाळा कमिटी अध्यक्ष भगवानराव जाधव, सहकाऱ्यांचे योगदान मिळाले. भीमराव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विश्वजित कांबळे यांनी आभार मानले.
माजी सभापती किसन जाधव, सरपंच मनीषा शेटे, कुस्ती संघटक तानाजी चवरे, कामगार केसरी सचिन बागट, जगन्नाथ माळी, शंकर अंबवडे, विकास पाटील, अमोल कदम, वैभवी कांबळे, सुनील जाधव, सुनील सुतार, जगन्नाथ सोरटे व ग्रामस्थ उपस्थित होते.
A00767
येणपे ः शिवाजी पाटील, दिनकर पाटील यांचा सत्कार करताना दिनकर जाधव व मान्यवर.
..................................................