पुणे

कात्रज दूध संघाकडून फरकाची रक्कम अदा

CD

कात्रज, ता. २७ : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर एक रुपयाचा फरक देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, दर फरकाची पहिल्या हप्त्याची रक्कम ऑक्टोबर २०२३ रोजी दूध उत्पादकांना अदा केलेली होती. तर उर्वरित दूध दरफरकाची ४ कोटी १३ लाख रुपये रक्कम ९६९ दूध उत्पादक संस्थांमार्फत नुकतीच अदा केली असून याचा लाभ सुमारे पन्नास हजार दूध उत्पादकांना मिळाला.

पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ शेतकऱ्यांना नेहमीच जास्तीत जास्त खरेदी दर देण्यास प्रयत्नशील राहिलेला असून दूध उत्पादकांना विविध इनपूट सुविधा संघामार्फत सवलतीच्या दरात पुरविण्यात येतात. तरी दूध उत्पादक व सर्व दूध संस्थांनी संघास स्वच्छ, ताज्या व भेसळ रहित उच्चतम गुणप्रतीच्या दूधाचा जास्तीत- जास्त पुरवठा करावा, असे आवाहन संघातर्फे अध्यक्ष केशरताई पवार यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT