पुणे

रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणारे दोघे अटकेत

CD

वाघोली, ता. १० ः महावितरण रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या दोघांना लोणीकंद पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून अडीच लाख रुपये किमतीच्या ३०० किलो तारा हस्तगत करण्यात आल्या.

मैनुद्दीन सल्लाउद्दीन खान (वय ३६, रा. कोंढापुरी चौक, ता. शिरूर), फिरोज मतीउल्लाह अहमद (वय ३३, रा. कोंढापुरी चौक, ता. शिरूर) अशी दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित्रातील तारा चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने पोलिस तपास करीत होते. कोंढापुरी येथील मैनुद्दीन हा भंगार व्यावसायिक साथीदाराच्या मदतीने तारा चोरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने फिरोज याचे नाव सांगितले. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी पिंपरी सांडस, न्हावी सांडस, राहू रस्ता, आष्टापूर, कोलवडी परिसरातील रोहित्रामधील तांब्याच्या तारा चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार, तपास पथकाचे उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे, पोलिस अंमलदार कैलास साळुंके, सागर जगताप, स्वप्नील जाधव, संतोष अंदुरे, मल्हारी सपुरे, शुभम चिनके, सुधीर शिवले, किरण पलांडे, अमोल ढोणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
----------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kupwara Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची धडक कारवाई, कुपवाडात दोन दहशतवाद्यांचा खात्मा; आठ दिवसांत दुसरी चकमक

Viral Video: महाकुंभातील नागा बाबांचे भाकीत खरं ठरलं? २०२५ मध्ये चौफेर पाणीच पाणी! कोण आहेत बालक गिरी बाबा?

Latest Marathi News Live Update : मुंबईकरांनो काळजी घ्या! आयएमडीचा रेड अलर्ट, पोलिसांचा नागरिकांना सल्ला

Navratri 2025: नवरात्रीत विड्यांच्या पानांनी करा 'हे' 4 खास उपाय, माता लक्ष्मीची कायम राहील कृपादृष्टी

Omkar Elephant : एका ओंकार हत्तीने दोन राज्यांना आणलं जेरीस, थेट अंगणात आल्याने तारांबळ; वनविभाग सपशेल अपयशी

SCROLL FOR NEXT