पुणे

वाघोलीत डंपरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

CD

वाघोली, ता. २८ : वाघेश्वर मंदिर चौकात रविवारी सकाळी डंपरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. भारती प्रकाश देठे (वय ४५, रा. विश्रांतवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. या परिसरात मागील पंधरा दिवसांत घडलेली ही दुसरी गंभीर घटना आहे.
या प्रकरणी पोलिस कर्मचारी दत्तात्रेय गोरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार डंपर चालक हिंमत जालिंदर कारके (वय ४२, रा. वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती देठे सकाळी आठच्या सुमारास दुचाकीवरून जात होत्या. वाघेश्वर मंदिर चौकात भावडी रस्त्याकडे वळणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर त्या थेट डंपरच्या मागील चाकाखाली गेल्या. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीचा क्रमांक पाहून पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. दरम्यान, याआधी १३ सप्टेंबर रोजी पुणे-नगर महामार्गावर खासगी बसच्या धडकेत रोहितकुमार अरुण बर्नावळ (वय १९) या तरुणाचा मृत्यू झाला होता.

नागरिकांकडून श्रद्धांजली
या दुर्घटनेनंतर नागरिकांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळ्याजवळ कँडल लावून भारती देठे यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. श्रद्धांजली कार्यक्रमात प्रकाश जमधडे, सीमा गुट्टे, हिरा वाघमारे, धर्मेंद्र सातव, सुनील साळवे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: छक्केनेही कप जिताया! पाकिस्तानच्या नांगी ठेचणारा तिलक वर्माचा सिक्स अन् गौतम गंभीरची नादखुळी रिऍक्शन; Video

IND vs PAK Final : सूर्यकुमार यादवने मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास दिला नकार; पाकिस्तानी खेळाडूंची ड्रेसिंग रुममधून बाहेर येण्यास टाळाटाळ, फुल ड्रामा

IND vs PAK Final : भारताने पाकड्यांना ठेचले! २१ दिवसांत तिसऱ्यांदा वस्त्रहरण करून जिंकला आशिया चषक; शेजारी तोंड लपवताना दिसले

IND vs PAK: बुमराहने काढलं बुक्कीत टेंगूळ! यॉर्करवर हॅरिस रौफचा 'दांडा' उडवला अन् प्लेन क्रॅशचं चोख उत्तर, Celebration Video Viral

Thane: ठाणे बनणार वेगवान वाहतुकीचे 'मल्टीमोडल' जंक्शन! बुलेट ट्रेन स्थानकाला रेल्वे, मेट्रो, अंतर्गत मेट्रो जोडणार, वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT