पुणे

‘बेकायदा बांधकामाबाबत सात दिवसांत अहवाल सादर करा’

CD

मार्केट यार्ड, ता. २१ : बेकायदा बांधकाम आणि भूखंड भाडेतत्त्वावर देण्याप्रकरणी बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांची खातेनिहाय चौकशी नव्हे तर, सात दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश पणन संचालकांनी दिलेला आहे. पुणे बाजार समितीच्या मार्केटयार्ड मधील बेकायदा बांधकामाबाबत पणन कार्यालयात अनेकवेळा तक्रारी झालेल्या आहेत. तसेच ‘कोट्यवधी रुपयांचा भूखंड कवडीमोल दरात १५ अडत्यांना’ दिला असल्याची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध केली होती. त्याअनुषंगाने पणन संचालकांनी या प्रकरणाची दखल घेत उपनिबंधकांना प्रत्यक्षात भेट देऊन आणि आवश्यक बाबी तपासून सात दिवसांच्या आत कार्यालयास अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांची खातेनिहाय चौकशी सुरू झालेली नसून मार्केट यार्डातील बेकायदा बांधकामाबाबत पणन कार्यालयात अनेकवेळा तक्रारी झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व त्याखालील नियम १९६७ मधील तरतुदीनुसार सात दिवसांत अहवाल सादर करावा, असे पणन संचालकांनी आदेशात म्हटले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT