पुणे

कांद्याच्या भावात पुन्हा घसरण सुरू निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू; किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये किलो

CD

मार्केट यार्ड, ता. ५ : केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कावर ४० टक्के वाढ केली आहे. यामुळे कांद्याच्या भावात घसरण सुरू झाली आहे. गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दर्जानुसार २० ते २२ रुपये प्रतिकिलोला भाव मिळत आहे. त्या तुलनेत मागील आठवड्यात कांद्याला २८ ते ३० रुपये प्रतिकिलो भाव मिळत होता. सध्या किरकोळ बाजारात प्रतिकिलो कांदा दर्जानुसार ५० ते ६० रुपये विकला जात आहे.

कांद्याच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी (ता.१९) ऑगस्टपासून कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केले आहे. हा निर्णय ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू केला आहे. याबाबत अधिसूचना काढली आहे. निर्यात शुल्काचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारपेठांवर व उत्पादकांवर झाला आहे.

गुलटेकडी मार्केट यार्डातील कांदा बाजारात सोमवारी सुमारे ७०० टन कांद्याची आवक झाली होती. कांद्याच्या भावात वाढ होत असल्याने साठवणूक केलेला कांदा बाजारात आणण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती. त्यातच भावात घट झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या निर्णयास विरोध केला आहे.


निर्यात शुल्क वाढीमुळे कांद्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. आधीच कांद्याचा भाव कमी होता. मागील काही दिवसांपासून ते वाढण्यास सुरुवात झाली होती. पण, या निर्णयामुळे पुन्हा भावात घसरण सुरू झाली आहे.
- नितीन पोळ, कांदा व्यापारी, मार्केट यार्ड

केंद्र सरकारने घेतलेला निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. आधीच शेतकरी संकटात असून त्यात कांद्याचे भाव पुन्हा घटू लागले आहेत. कांद्याला अजूनही अनुदान मिळालेले नाही. त्याबाबतही सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.
- बाळासाहेब देसाई, शेतकरी, बार्शी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar Election : आघाडीच्या निर्णयापर्यंत वेट ॲण्ड वॉच! राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, भूमिका गुलदस्त्यात

Ind vs NZ ODI 2026 : न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेतून पंड्या, बुमराहसह तिघांना वगळणार? 'या' धडाकेबाज फलंदाजाची एन्ट्री होण्याची शक्यता

Vikay Kokate: विजय कोकाटे यांची न्यायालयात धाव, शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का, राखी जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश

Chhatrapati Sambhajinagar News : प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा कळस! मृत शिक्षकांना निवडणूक ड्यूटी; बदली, बीएलओ शिक्षकांनाही आदेश

SCROLL FOR NEXT