मार्केट यार्ड, ता. १७ : पूना मर्चंट्स चेंबरच्या कार्यकारी मंडळाच्या द्विवार्षिक निवडणूक प्रक्रियेतील सर्व कामकाज कायद्याने व निःपक्षपातीपणे होत असल्याचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी स्पष्ट केले आहे. अर्ज नामंजूर झालेल्या उमेदवारांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचेही त्यांनी सांगितले.
नहार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, या निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून के. एम. डी. एस. अँड असोसिएटसची नेमणूक कार्यकारी मंडळाच्या ३१ जुलै २०२५ रोजी झालेल्या बैठकीत एकमताने पारित ठरावानुसार करण्यात आली आहे. ही संस्था पुण्यातील नामांकित कंपनी सेक्रेटरी फर्म असून निवडणुकीसंदर्भातील सर्व अधिकार त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहेत. फॉर्म छाननी दरम्यान काही सभासदांचे अर्ज नामंजूर करण्यात आले, तर काही अर्ज कागदपत्रांची शहानिशा करण्यासाठी स्थगित ठेवण्यात आले होते. त्यापैकी एका उमेदवाराची कागदपत्रे आधीच चेंबरकडे जमा असल्यामुळे त्यांचा अर्ज मंजूर झाला. मात्र, उर्वरित उमेदवारांनी नव्याने कागदपत्रे दाखल केली. अर्जासोबत सर्व कागदपत्रांची पूर्तता बंधनकारक असल्याने त्यांचे अर्ज नामंजूर झाल्याचे त्यांना समक्ष सांगितले.
अध्यक्षांनी पक्षपातीपणे अर्ज बाद केले, हा आरोप चुकीचा असून सर्व प्रक्रिया कायद्याने आणि बहुमतानुसारच पार पडली आहे. कंपनी सचिव अथवा कोणताही व्यावसायिक सल्लागार गोपनीय माहिती कोणासोबतही शेअर करत नाही. तरीसुद्धा त्यांच्यावर ‘प्रॉक्सी फॉर्म’ बाहेर नेल्याचा आरोप करत कार्यालयात आरडाओरडा करून गोंधळ घालण्यात आला, ज्यामुळे महिला कर्मचारी घाबरले. त्यानंतर अध्यक्षांनी उपस्थित राहून सर्व कागदपत्रे कार्यालयातच असल्याची खात्री करून दिली. काही उमेदवारांकडून पोलिस कारवाईच्या धमक्या आणि खोटी माहिती पसरविण्याबाबत ईमेलद्वारे माहिती देण्यात आली आहे. कायद्याने असलेले अधिकार वापरून निपक्षपातीपणे भूमिका बजावली आहे, असे नहार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.