पुणे

भेंडी, टोमॅटो, कोबी, मटारच्या भावात वाढ

CD

मार्केट यार्ड, ता. २८ : राज्यभर सतत पाऊस सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर फळभाज्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी (ता. २८) फळभाज्यांची आवक कमी झाली होती. परिणामी सातारी आले, भेंडी, टोमॅटो, कोबी, शिमला मिरची, मटारसह काही भाज्यांच्या भावात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. तर अन्य सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
मार्केट यार्डात राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ८० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश येथून हिरवी मिरची २४ ते २५ टेम्पो, इंदूर येथून गाजर ५ ते ६ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी २ टेम्पो, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा २ ते ३ टेम्पो, तमिळनाडू येथून तोतापुरी कैरी १५० ते १६० क्रेट, कर्नाटक येथून घेवडा ३ टेम्पो, गुजरातमधून भुईमूग ५ ते ६ टेम्पो, मध्यप्रदेशातून लसूण सुमारे १० ते १२ टेम्पो, तर इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाट्याची ३० ते ४० टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ४०० ते ५०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो ६ ते ७ हजार क्रेट, हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, काकडी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ७ ते ८ टेम्पो, गाजर ३ ते ४ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची ७ ते ८ टेम्पो, भुईमूग शेंग ५० गोणी, मटार ४०० ते ५०० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा सुमारे ५० ते ६० ट्रक आणि बटाट्याची २५०० गोणी इतकी आवक झाल्याची माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : ८०-१३०, बटाटा : १३०-२२०, नवीन बटाटा : १७०-२२०, लसूण : २५०-८००, आले सातारी : ३००-६००, भेंडी : ६००-८००, गवार : ६००-८००, टोमॅटो : २५०-३५०, दोडका : २५०-३५०, हिरवी मिरची : २५०-३५०, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००- २५०, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी : २००-२२०, पापडी : ४००-४५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १५०-२००, कोबी : १५०- २२०, वांगी : ३००-५००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : ८००- १२००, तोंडली : कळी : ३५०-४००, जाड : २०० -२२०, शेवगा : १०००-११००, गाजर : २५०-३५०, वालवर : ३५० -४००, बीट : १५०-१६०, घेवडा : ५००-५५०, कोहळा : १००- १५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ४००-४५०, मटार : स्थानिक मटार : १५०० ते २०००, पावटा : ५००-६००, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी : ५००- ६००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००, रताळी : ३५०-४००.

पावसाचा पालेभाज्यांना फटका
पावसाने पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी बाजारात आवक कमी झाल्याने सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावात शेकडा १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली होती. घाऊक बाजारात रविवारी (ता. २८) कोथिंबिरीची सुमारे १ लाख ५० हजार जुडी, तर मेथीची ५० हजार जुडींची आवक झाली होती.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १५००-२५००, मेथी : १५००-२५००, शेपू : ८००- १५००, कांदापात : १०००-१५००, चाकवत : ५००-१०००, करडई : ५००-१०००, पुदिना : ५००-८००, अंबाडी : ५००-८००, मुळे : ८००-१५००, राजगिरा : १५००- २०००, चुका : ५००-८००, चवळई : ५००-८००, पालक : १५००-२५००.

फळांच्या मागणीत घट
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे पुणे बाजार समितीच्या मार्केट यार्डातील फळबाजारात बहुतांश फळांची आवकही घटली असून ग्राहकांकडून मागणीदेखील कमी आहे. परिणामी कलिंगड, खरबूज, लिंबू, संत्री आणि मोसंबीच्या भावात १० ते २० टक्क्यांनी घसरण झाली आहे, तर पपईच्या भावात वाढ झाली असून डाळिंब, चिक्कू, अननस आणि बोरांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
कलिंगड आणि खरबुजाच्या भावात प्रतिकिलोमागे ५ रुपयांची
घसरण झाली आहे. लिंबाच्या भावात गोणीमागे १०० ते २०० रुपये, संत्र्यांच्या भावात २० ते ३० टक्के, तर मोसंबीचे भाव २० टक्क्यांनी उतरले आहेत. पपईच्या भावात किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली असून अन्य सर्वच फळांचे भाव स्थिर आहेत.
गुलटेकडी येथील मार्केट यार्ड फळबाजारात रविवारी (ता. २८) मोसंबी ८० ते ९० टन, संत्री २२ ते २५ टन, डाळिंब ८० ते १०० टन, पपई ७ ते ८ टेम्पो, लिंबे ६०० ते ८०० गोणी, कलिंगड २ ते ३ टेम्पो , खरबूज १ ते २ टेम्पो, चिक्कू १०० ते ६०० गोणी, पेरू ५०० ते ६०० क्रेट, अननस ४ ट्रक, बोरे २० ते २५ गोणी, तर सीताफळाची २५ ते ३० टन इतकी आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे :
लिंबे (प्रतिगोणी) : १५०-५००, मोसंबी : (३ डझन) : १२०-२४०, (४ डझन) : ३०-९०, संत्री : (१० किलो) : १५०-६००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५०-१५०, आरक्ता : १०-५०, गणेश : ५-२५, कलिंगड : ७-१२, खरबूज : २०- ३०, पपई : १२-३०, चिक्कू (दहा किलो) : १००-६००, पेरू (२० किलो) : ३००-५००, अननस (१ डझन): १००-६००, सीताफळ (१ किलो) : १५-१००, बोरे (१० किलो) : चमेली : २२०-२७०, चेकनट : ६००-८००, उमराण : ८०-१२०, चण्यामण्या : ६००- ७५०.

दर्जेदार फुलांना मागणी
नवरात्रोत्सव सुरू असल्याने मार्केट यार्ड बाजारात दर्जेदार फुलांना चांगली मागणी आहे, परंतु पावसामुळे आवक कमी आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात ओला आणि डागी माल येत आहे. बाजारात निवडून माल घेतला जात असून त्यालाच भाव मिळत आहे. दसऱ्याच्या आधी दोन दिवस फुलांच्या दरात आणखी तेजी येईल, अशी माहिती फूलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे :
झेंडू : ५० -१००, गुलछडी : ३००-८००, अ‍ॅष्टर : जुडी २०-३०, सुट्टा ४०-५०, कापरी : ७०-१५०, शेवंती : ५०-१५०, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : ३०-४०, गुलछडी काडी : १००-१५०, डच गुलाब (२० नग) : ७०-१२०, जरबेरा : ३०-४०, कार्नेशियन : १००-१५०, शेवंती काडी : २००-२५०, लिलियम (१० काड्या) : ५००-९००, ऑर्किड : ३००-३५०, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१००, जिप्सोफिला : १५०-२००, जुई : ८००-११००, चमेली : ८००-१०००.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: भारताला धक्का! हार्दिक पांड्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर; फायनलसाठी कसे आहेत संघ

Veer Sharma: दुर्दैवी! फ्लॅटमध्ये आग लागली अन्...; टीव्हीवरील प्रसिद्ध बाल कलाकार आणि त्याच्या भावाचा मृत्यू, सिनेक्षेत्रात हळहळ

IND vs PAK Final Live: चल हट...! सूर्यकुमार यादवचा पाकिस्तानी कर्णधारासोबत फोटो काढण्यास नकार, वातावरण तापले; मोहसिन नक्वीचे वादग्रस्त विधान

Vivek Kolhe: गुन्हेगारांना पाठीशी घालणारा ‘आका’ कोण?: विवेक कोल्हेंचा सवाल; फरार स्वीय सहायकास पोलिसांसमोर हजर करा

Navratra Bhondla: नवरात्रात भोंडला का खेळतात? हे त्यामागील कारण

SCROLL FOR NEXT