पुणे

थंडीची चाहूल लागताच बाजरी, ज्वारीला मागणी

CD

मार्केट यार्ड, ता. १४ : थंडीची चाहूल लागल्याने मागील काही दिवसांपासून बाजारात मोठ्या प्रमाणात बाजरीला मागणी वाढली आहे. बाजरी ही उष्ण असल्याने थंडीत आवर्जून खाल्ली जाते, तसेच ज्वारीलाही मागणी वाढली आहे. यंदा पडलेल्या सततच्या पावसामुळे बाजरी आणि ज्वारीच्या उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे बाजरी, ज्वारीचे दर क्विंटलमागे २०० ते ५०० रुपयांनी वाढले आहेत. यंदा दर तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.


महाराष्ट्र, राजस्थानात झालेल्या अवेळी पावसामुळे बाजरीच्या प्रतवारीवर मोठा परिणाम झाला आहे. बाजारात चांगल्या मालाला अधिक मागणी आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज ५० ते ६० टन बाजरी आणि ज्वारी विक्रीसाठी पाठविली जात आहे. बाजरीचे उत्पादन राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच कर्नाटकच्या काही भागात घेतले जात असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

महाराष्ट्रात बीड, गेवराई, पाथर्डी, मंचर, केडगाव, सुपा, नाशिक येथील बाजारपेठेतील व्यापारी मोठ्या प्रमाणावर बाजरीची खरेदी करतात. बीड, गेवराई भागातील ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने पश्चिम महाराष्ट्रात वास्तव्यास येतात. ऊसतोड कामगारांकडून बाजरीला मोठी मागणी असते. महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू झाल्यानंतर बाजरीच्या मागणीत वाढ होते, असे मार्केट यार्डातील व्यापारी नितीन नाहर यांनी सांगितले.
--------
अशी आहे सद्यःस्थिती
- सततच्या पावसामुळे बाजरी, ज्वारीचे नुकसान
- शेतकऱ्यांना आर्थिक झळ
- थंडीमुळे मागणी वाढली
- बाजरी, ज्वारीची आवक कमी
- हवामान बदलामुळे उत्पादनावर परिणाम
---------
यंदाच्या सततच्या पावसाने जवळपास सर्वच पिकांची हानी झाली आहे. त्यामुळे धान्याचे भाव नैसर्गिकरीत्याच वाढले आहेत. दिवाळीनंतर थंडी वाढताच बाजरीची मागणी वाढली आहे, तर गव्हाकडे तुलनेने कमी कल दिसतो. पूर्वी गहू पोत्यात येत असल्याने त्याला हवा मिळायची, पण आता प्लॅस्टिक आणि मशिन पॅकिंगमुळे हवा खेळत नाही. त्यामुळे माल पटकन खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.
- अभय संचेती, ज्येष्ठ व्यापारी, मार्केट यार्ड
---------
बाजरीने शरीराला नैसर्गिक उष्णता
थंडीच्या दिवसांत आहारात बाजरीचा समावेश केल्याने शरीराला नैसर्गिक उष्णता आणि ऊर्जा मिळते. या धान्यात तंतूमय पदार्थांसह लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असल्याने प्रतिकारशक्ती मजबूत राहते. हिवाळ्यात शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी बाजरी उत्कृष्ट मानली जाते. ती पचनासही हलकी आहे. याच कारणामुळे या काळात बाजरीकडे ग्राहकांचा कल अधिक दिसत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
-------
घाऊक बाजारातील दर्जानुसार किलोचे दर
---------------------
प्रकार - २०२४ (दर) २०२५ (दर)
बाजरी- २५ ते ४० रुपये - ३५ ते ५० रुपये
ज्वारी- ३५ ते ५० रुपये - ४० ते ६० रुपये
गहू लोकवन - ३६ ते ४६ रुपये - ३८ ते ३८ रुपये
गहू सिहोर - ४८ ते ५५ रुपये - ४८ ते ५५ रुपये
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market : बजेटआधी शेअर बाजार तापला! या आठवड्यात 5 नवे आयपीओ उघडणार; 'या' मोठ्या कंपनीची लिस्टिंग होणार

Philippines Ferry Accident : टायटॅनिक सारखी भीषण दुर्घटना ! ३५० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले, १८ जणांचे मृतदेह हाती

Latest Marathi news Update : तिरंगा ध्वज पदयात्रेला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे - सोमैया

Indian Flag: प्रजासत्ताक दिनानंतर राष्ट्रध्वजाची सन्मानपूर्वक विल्हेवाट कशी लावावी? वाचा कायदा काय सांगतो

प्रजासत्ताक दिन 2026 विशेष: ‘बॅटल ऑफ गलवान’मधील ‘मातृभूमी’पासून सदाबहार देशप्रेम जागवणारी गीते

SCROLL FOR NEXT