Minister Nitin Gadkari sakal
पुणे

सातारा रस्त्यांवरील टोल होणार रद्द'; नितीन गडकरी

सातारा रस्त्यांवरील टोल रद्द (टर्मिनेट) करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज (ता. २४) केली.

सकाळ वृत्तसेवा

कात्रज - सातारा रस्त्यांवरील टोल रद्द (टर्मिनेट) करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज (ता. २४) केली. कात्रज चौकातील सहा पदरी उड्डाणपुलाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, 'कात्रज उड्डाण पुलाच्या निमित्ताने कात्रज चौकातील वाहतूक कोंडीवर उपाय निघणार आहे. पुणे सातारा रस्ता हा अडचणीचा झाला होता. या मार्गावर अनेक अपघात होत होते. या रस्त्यावरही मार्ग निघाला असून रस्त्याचा टोल टर्मीनेट करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गाकडून त्यांसाठी ५० कोटी रुपये देऊन येत्या डिसेंबरपर्यंत या रस्त्याचे काम मार्गी लागू शकते. त्याचबरोबर, एका उत्तम संस्थेकडून अभ्यास चालू असून हा रस्ता ऊत्तम होईल, असा विश्वास गडकरींनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार योगेश टिळेकर, सभागृहनेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रमकुमार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

Indian Visa Regulations: परदेशी नागरिकांसाठी भारताचे व्हिसा नियम बदलले; एका चुकीमुळे होऊ शकते मोठी कारवाई!

Pune Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माघार; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

मच्छिंद्र कांबळी यांचं अजरामर 'वस्त्रहरण' नाटक पुन्हा भेटीला येणार; 'हा' कसलेला अभिनेता साकारणार तात्या सरपंच

Latest Marathi News Live Update : चाकण परिसरात घरगुती गॅस सिलेंडरच्या बेकायदेशीर विक्रीचा भंडाफोड; २५१ सिलेंडर जप्त

SCROLL FOR NEXT