राजगुरूनगर (पुणे) : खेड तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आज ७० कोरोनाबधित आढळले. एकूण रुग्ण संख्या २२४९ झाली आहे. तालुक्यात आज चार मृतांची नोंद झाली, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. बी. गाढवे यांनी दिली.
चाकण येथील ३० वर्ष वयाच्या तरुणाचे आणि शेलापिंपळगाव येथील ८० वर्ष वयाच्या वृद्ध महिलेचे १७ ऑगस्ट रोजी कोरोनाने निधन झाले. तर सोळू येथील ८० वर्ष वयाच्या वृद्ध महिलेचे १८ ऑगस्ट रोजी निधन झाले. निघोजे येथील ५६ वर्षाच्या प्रौढाचे १२ ऑगस्ट रोजीच निधन झाले असून त्याची आज तालुक्याच्या रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
गेल्या चोवीस तासात चाकणला १५, आळंदीत १ आणि राजगुरूनगरला १३ रूग्णांची भर पडली. तालुक्याच्या ग्रामीण भागात ४१ रुग्ण सापडले. वडगाव घेणंदला ५, खराबवाडीला ५ आणि रासे येथे ४ रुग्ण सापडले. मेदनकरवाडी, चांडोली आणि दावडी यांठिकाणी प्रत्येकी ३ रुग्ण आढळले. तर सांडभोरवाडी, आंबेठाण, भोसे आणि दौंडकरवाडी याठिकाणी प्रत्येकी २ रुग्ण आढळले. निघोजे, ढोरे भांबुरेवाडी, होलेवाडी, वडगाव पाटोळे, कोहिंडे बुद्रुक, वाफगाव, येलवाडी, भांबोली, सोळू, मोई या गावांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.