कोरोना  sakal
पुणे

पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ७१८

सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत मंगळवारच्या तुलनेत बुधवारी ७१ ने वाढ झाली आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांच्या (corona patient) संख्येत मंगळवारच्या (ता.१४) तुलनेत बुधवारी (ता.१५) ७१ ने वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा १ हजार ७१८ झाली आहे. हीच संख्या मंगळवारी १ हजार ७४७ इतकी होती. दरम्यान, बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात २३९ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील १२० नवे रुग्ण आहेत. दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये ४९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ५७, नगरपालिका हद्दीत ११ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत.

याशिवाय दिवसात जिल्ह्यातील दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हे दोन्ही मृत्यू जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीत दिवसात एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही.

बुधवारी दिवसभरात १६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ८० जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ४७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २९, नगरपालिका हद्दीतील सहा आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील चार जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ५७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित १ हजार १४३ जण गृह विलगीकरणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 2nd ODI: रोहित शर्माला सूर गवसला, श्रेयस अय्यरही पेटला! हर्षित राणाच्या वादळी खेळीने भारताला पोहोचवले अडीचशे पार

तेजस्वी यादव महाआघाडीचे CM पदाचे उमेदवार, आता NDAने सांगावं, नाहीतर महाराष्ट्रासारखं कराल; भाजपवर टीका

Latest Marathi News Live Update : दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला आलेल्या महिला भाविकांना भाऊबीजच्या निमित्ताने 10 रुपयांची नोट भेट

Yearly Horoscope: हे वर्ष तुम्हाला कसे जाणार..? नशिबाची दारं उघडणार की आणखी प्रतिक्षा..?

एकीकडे शटडाऊन अन् दुसरीकडे २१०० कोटी खर्चून डान्स हॉलचं बांधकाम; ट्रम्पनी व्हाइट हाऊसवर चालवला बुलडोजर

SCROLL FOR NEXT