उधेवाडी (लोणावळा) - येथे पर्यटकांना लष्करी सरावाचे प्रशिक्षण देताना डेला ॲडव्हेंचरचे जवान.
उधेवाडी (लोणावळा) - येथे पर्यटकांना लष्करी सरावाचे प्रशिक्षण देताना डेला ॲडव्हेंचरचे जवान. 
पुणे

अरे व्वा! आता पर्यटन पण करा अन्‌ लष्करी प्रशिक्षणही घ्या

सकाळ वृत्तसेवा

लोणावळा - तुम्ही लोणावळा-खंडाळ्याला फिरायला आला असाल आणि तुमच्याकडे काही वेळ असेल, तर त्या काळात तुम्हाला लष्कराच्या सरावाचे प्रशिक्षण घेता येईल. डेला ॲडव्हेंचर ट्रेनिंग सेंटरने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राजमाची किल्ल्याजवळ उधेवाडीत शिरोता धरणालगत हे प्रशिक्षण उपलब्ध असून, पर्यटनाच्या माध्यमातून लष्करी प्रशिक्षण देणारा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. 

सध्याच्या काळात दहशतवादी हल्ले वाढत चालले आहे. तसेच नैसर्गिक पूर, मोठ्या आगीच्या घटना घडत असताना आकस्मिक येणाऱ्या संकटाशी सामना करण्याचीही वेळ येते. अशा प्रसंगी घाबरून न जाता स्वतःचा बचाव करण्याबरोबर इतरांना मदत कशी करायची याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण डेला ॲडव्हेंचर ट्रेनिंग सेंटरकडून देण्यात येत आहे.

समूहाचे प्रमुख जिमी मिस्त्री यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबईत घडलेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात निरपराधांचे बळी गेले. त्याच घटनेचा बोध म्हणून डेलाचे समूहाचे प्रमुख जिमी मिस्त्री यांनी प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. लष्कराच्या सदर्न कमांडचे माजी प्रमुख निवृत्त लेफ्टनंट जनरल रेमंड नऱ्होना यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्करातील दहशतवादविरोधी लढ्यात जिवाची बाजी लावणारे निवृत्त जवान, अधिकारी आणि प्रत्यक्ष दहशतवाद्यांचा खातमा करणारे ब्लॅक कॅट कमांडो येथे प्रशिक्षक म्हणून नियुक्त आहेत. दहशतवादी हल्ल्याप्रसंगी तसेच उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्याबरोबर इतरांना वाचविण्याचे तंत्र येथे शिकविले जात आहे.

प्रशिक्षणाचे स्वरूप 

  • तोल सांभाळत पाइपवरून चालणे
  • क्रॉलिंग करीत पुढे सरकणे
  • दोरीवर चढणे
  • दोरीच्या साह्याने तयार केलेला पूल ओलांडणे
  • आगीतून चालणे
  • अतिरेक्‍याकडून होणाऱ्या गोळीबारातून बचाव करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT