Goa 
पुणे

गड्या आपला देशच बरा; पर्यटकांची परदेशाकडे पाठ

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबलेलं पर्यटन जग आता पुन्हा सुरळीत होत आहे. त्यात हॉटेल आणि ट्रॅव्हल कंपन्यांकडून देण्यात येत असलेल्या चांगल्या ‘ऑफर’मुळे पर्यटनाची आवड असलेल्यांची मुशाफिरी पुन्हा सुरू झाली आहे. मात्र कोरोनाचे संकट अद्याप सरले नसल्याने पर्यटक परदेशाऐवजी देशातील स्थळांनाच पसंती देत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ख्रिसमसच्या निमित्ताने सध्या गोवा आणि कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. कोरोनामुळे खबरदारीचा भाग म्हणून नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर कमी करत स्वतःच्या वाहनांमधून हा पल्ला गाठत आहेत. तर काही जण ट्रॅव्हल कंपन्यांच्या गाड्या भाड्याने घेत आहेत. कोरोनापूर्वी अनेक लोकांनी परदेशात फिरायला जाण्याचे नियोजन केले होते; परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांचे नियोजन फिस्कटले. त्यामुळे सध्या देशातील पर्यटनस्थळांना भेट देण्याला नागरिकांची पसंती आहे.

पर्यटनाची हौस असलेले कुलदीप गोसावी याबाबत म्हणाले, ‘‘परिवारासोबत बाहेर जाण्याची इच्छा होती. त्यात गोव्याच्या टूरसाठी चांगली ‘ऑफर’ मला ट्रॅव्हल कंपनीकडून मिळाल्याने यंदा ख्रिसमस आणि नवीन वर्ष गोव्यात साजरा करणार आहे.’

अनलॉकमुळे सध्या आमच्या व्यवसायाला सुरुवात होत असून, पर्यटकांनाही काही सवलती आम्ही देत आहोत. त्यामुळे हळूहळू पर्यटक देखील पर्यटनासाठी पसंती दाखवत आहेत. 
- आनंद मिश्रा, ट्रॅव्हल व्यावसायिक

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Threat : रणवीर सिंग नंतर आता सलमान खानच्या निकटवर्तीय अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, कोट्यावधींची मागितली खंडणी

Satara Politics: सातारा जिल्ह्यात ‘सत्ता’खल! राष्‍ट्रवादी-शिवसेनेत खलबते; संजीवराजे ऑनफिल्‍ड, नेमकं काय ठरलं?

Maha Shivratri 2026 Rashifal: भगवान महादेवाच्या 'या' चार राशी आहेत प्रिय! महाशिवरात्रीला होऊ शकतो प्रचंड आर्थिक लाभ

मोठी बातमी! गुंठ्यावरील बांधकामांसाठी आता लगेच तात्पुरती मंजुरी अन् ‘ना-हरकत’ प्रमाणपत्रही; नगररचना विभागाचा आदेश, कोठे करायचा अर्ज? वाचा...

Kid Friendly Recipes: राजमा भात खाऊन कंटाळा आलाय? चवीत बदल हवा असेल तर हे 2 सोपे पदार्थ नक्की बनवा

SCROLL FOR NEXT