Trade unions will protest again on the issues of farmers and workers 
पुणे

शेतकरी व कामगारांच्या प्रश्‍नांवर कामगार संघटना पुन्हा रस्त्यावर

सकाळवृत्तसेवा

पुणे : असंघटित श्रमिक आणि छोट्या व्यावसायिकांना मिळणारे तुटपुंजे उत्पन्न कोरोनामुळे गेले सहा महिने थांबले आहे. तर कित्येक शेतकऱ्यांची वाताहत झालेली आहे. त्यात कामगार कायद्यात व बड्या उद्योगांना धान्य घेता यावे यासाठी शेती क्षेत्रात मोठे बदल करण्यात येत आहेत, असा आरोप करीत या विषयावर कामगार संघटना संयुक्त कृती समिती पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशातील शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्‍नांवर केंद्रीय कामगार संघटनांच्या कृती समितीने देशव्यापी आंदोलनाची हाक दिलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी (ता. 23) वाकडेवाडीत असलेल्या कामगार आयुक्त कार्यालयात निदर्शने करण्यात येणार आहे, अशी माहिती इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिली. असंघटित कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी समितीने यापूर्वी देखील लॉकडाउन काळात आंदोलने केली आहेत.


ऑनलाइन शाळेसाठी पालक आग्रही; मात्र शाळांचा नकार

जनतेची खरेदी शक्ती वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी या परिस्थितीचा गैरफायदा घेत आहे. नफ्यात चालणाऱ्या सार्वजनिक क्षेत्राचे, आयुध निर्माण कारखान्यांचे देखील खासगीकरण करण्याचे देशविघातक कारस्थान सुरू आहे. कित्येक शेतकऱ्यांची वाताहत झालेली आहे. त्याचा गैरफायदा बड्या उद्योगांना आणि आंतरराष्ट्रीय धान्य कंपन्यांना घेता यावा यासाठी शेतीक्षेत्रात भीषण असे बदल करण्यात येत आहेत, असे सिटू पुणेचे अजित अभ्यंकर यांनी सांगितले. इंटक, सिटू पुणे, आयटक, श्रमिक एकता महासंघ, घर कामगार संघटना, संरक्षण कामगार फेडरेशन आदी कामगार संघटना आंदोलनात सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT