Trader is beaten up with his Worker by gang in Pune
Trader is beaten up with his Worker by gang in Pune 
पुणे

पुण्यात भेळ विक्रेत्यासह कामगारास टोळक्‍याकडून दांडक्‍याने जबर मारहाण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भेळीचा गाडा लावण्यावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून सात ते आठ जणांच्या टोळक्‍याने भेळविक्रेत्यासह त्याच्या कामगारास लाकडी दांडक्‍याने जबर मारहाण केली. याबरोबरच भेळीच्या गाड्याची तोडफोड करुन 25 हजार रुपयांचे नुकसान केले. ही घटना शनिवारी रात्री कात्रज परिसरात घडली. 

याप्रकरणी गौरव पोटघन (वय 22, रा.कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोटघन यांचा कात्रजमधील स्वामी विवेकानंद इमारतीसमोर भेळीचा गाडा आहे. या भेळीच्या गाड्यावरुनच आरोपींसमवेत पोलिसांचे वाद झाले होते. त्यातून चार नोव्हेंबरला फिर्यादी यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादीने आरोपींना ''तू माझ्या अंगावर कार का घातली'', याचा जाब विचारला होता. त्यानंतर आरोपी व त्याचे साथीदार शनिवारी(ता.9) रात्री साडे आठ वाजता फिर्यादीच्या भेळीच्या गाडीवर आले. त्यांनी फिर्यादीसह त्यांच्या कामगारास लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादींच्या भेळीच्या गाडीची तोडफोड करुन त्यांचे 25 हजार रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक एस.आर.चिवडशेट्टी हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

SCROLL FOR NEXT