Pune : कात्रज-कोंढवा रस्त्यांवर वाहतूककोंडी नित्याचीच sakal media
पुणे

Pune : कात्रज-कोंढवा रस्त्यांवर वाहतूककोंडी नित्याचीच

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : कात्रज कोंढवा रस्त्याचे सुरू असलेले काम, रस्त्यांवर पडलेले खड्डे, अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक आदी कारणांमुळे कात्रज कोंढवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे दिसून येत असून वाहनचालकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

पोलिसांकडून बंदोबस्त ठेवत वाहतूक नियमनावर भर दिला जात असला तरीही वेगवेगळ्या कारणांमुळे संध्याकाळच्यावेळी तर होणाऱ्या वाहतूक कोंडीमध्ये वाहन चालकांव दीड ते दोन तास या वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ येते. रस्ता अरुंद असून सायंकाळी ५ ते ९ या वेळात तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या काळात रस्त्यांवरून तासी १० हजारांहून अधिक वाहनांची येजा होते.

या उपाययोजनांची गरज

  • रस्त्यांवरील छोटे-मोठे खड्डे त्वरित बुजवावे

  • वाहतूककोंडीच्या वेळात अवजड वाहनांना मनाई करावी

  • रस्त्यांवर उभ्या करण्यात येत असलेल्या वाहनांवर कडक कारवाई करावी

"कात्रज-कोंढवा रस्त्यांवर प्रवास करणे कठीण झाले आहे. सायंकाळच्या वेळी या रस्त्यार किमान अर्धा ते एक तास अडकून राहावे लागते. प्रशासनाने कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे."

- तेजस शिंदे, वाहनचालक

"कात्रज ते खडी मिशन चौकापर्यंत दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच या वाहतूक कोंडीमुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडते याचा प्रचंड त्रास नागरिकांना होत आहे. त्यातच रस्त्यावर जागोजागी मोठे मोठे खड्डे आहेत त्यामुळे अनेकवेळा अपघातही होतात. गेल्या अनेक वर्षापासून प्रशासन दुर्लक्ष करीत आहे."

- विनोद रांजणे, स्थानिक नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT