traffic jam at kirkatwadi fata on sinhagad road traffic police pune kirkatwadi Sakal
पुणे

Pune News : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवर मोठी वाहतूक कोंडी

विनापरवानगी आयोजित कार्यक्रमातील वाहनांचा लोंढा रस्त्यावर आल्याने पोलिसही हतबल; स्थानिक रहिवासी व पर्यटकांचे हाल

निलेश बोरुडे

किरकटवाडी: सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवर मोठी वाहतूक कोंडी झाली असून खडकवासला व नांदेड फाटा बाजूकडे सुमारे एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

नांदोशी-सणसनगर येथील एका आश्रमाने पोलिस प्रशासनाची परवानगी न घेता आयोजित केलेल्या कार्यक्रमातील शेकडो चारचाकी वाहने, बस व दुचाकी अचानक आल्याने अगोदरच अरुंद असलेल्या किरकटवाडी फाट्यावर त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.

सध्या एकच पोलिस कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तैनात असून वाहनांची संख्या जास्त असल्याने पोलिस कर्मचारी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. रविवारच्या सुट्टीमुळे खडकवासला, सिंहगड, पानशेत या परिसरात सकाळपासून मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते.

सायंकाळी पाच वाजल्यापासून सिंहगड रस्त्यावरील खडकवासला धरण चौक, किरकटवाडी फाटा व नांदेड फाटा या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली होती.

सायंकाळी साडेचार वाजल्यापासून अचानक नांदोशी-सणसनगर येथील एका संस्थेच्या आश्रमात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांची शेकडो वाहने किरकटवाडी -नांदोशी रस्त्यावरुन किरकटवाडी फाट्यावर आल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला व वाहतूक कोंडी निर्माण झाली.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित आश्रमाच्या माध्यमातून काही खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. हवेली पोलिस ठाण्याचे एकच वाहतूक पोलिस कर्मचारी वाहतूक सुरळीत करत होते परंतु खडकवासला, नांदेड फाटा व किरकटवाडी अशा तिन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याने तेही हतबल झाल्याचे दिसत होते.

याबाबत हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्याशी संपर्क साधला असता, 'मनुष्यबळ कमी असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी अधिकचे पोलिस कर्मचारी पाठवणार कसे? संबंधित आश्रमाने कोणतीही परवानगी न घेता कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे' अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली.

नेहमीचीच समस्या

नांदोशी-सणसनगर येथील आश्रमात नेहमीच असे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक येथे एकावेळी जमतात. ऐन सुट्टीच्या व सणांच्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असते. सुट्टीच्या दिवशी मुख्य सिंहगड रस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांची संख्या जास्त असते.

सायंकाळी पर्यटक परतीच्या मार्गावर असताना त्याच वेळी या आश्रमातील कार्यक्रम संपलेला असतो आणि किरकटवाडी फाट्यावर वाहतूक कोंडी झालेली असते. यामुळे स्थानिकांसह पर्यटकांनाही मनःस्ताप सहन करावा लागतो. याबाबत हवेली पोलिसांनी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagarpalika Election Date: या तारखेला नगरपालिकेची झुंज! स्थानिक स्वराज्यच्या पहिल्या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, Time Table बघा अन् लागा तयारीला...

Duplicate Voters List : दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार, नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आयोगाने उचलले मोठे पाऊल, कशी घेणार दक्षता ?

Latest Marathi News Live Update : शेतकरी व्यापाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत होणार 'या' अभिनेत्याची एंट्री; प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांनीच सांगितलं नाव

Ganesh Naik : १५०० बिबट वनतारामध्ये स्थलांतरित व १००० पिंजरे खरेदीसाठी १० कोटी रुपये निधी मंजूर करण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT