pune sakal
पुणे

कात्रज : गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर रस्त्याला वाहतूक कोंडीचा फास

अतिक्रमणांनी घोटला रस्त्याचा गळा; कारवाई न झाल्यास कोंढवा डेव्हलपमेंट फोरमचा आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : रस्त्यांवर झालेले अतिक्रमण, पावसामुळे पडलेले खड्डे आदी कारणांमुळे गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर रस्त्याला वाहतूक कोंडीने घेरले आहे. वाहनचालकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. यावर तत्काळ कारवाई न झाल्यास कोंढवा (kondhwa) डेव्हलपमेंट फोरमकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (Traffic jam on Gangadham Chowk to Shatrunjay Mandir road)

कात्रज-कोंढवा रस्त्यावरून मार्केट यार्डकडे जाणारी वाहने, पुणे शहरातून दक्षिण पुण्यात जाण्यासाठी तसेच सासवड, कात्रज, कोंढवा-येवलेवाडी आदी भागात जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होतो. त्यामुळे रस्त्यांवर नेहमीच गर्दी असते. विशेषतः आईमाता मंदिर परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचा फटका शांतीनगर, गोकुळनगर, सुखसागरनगर, साईनगर, टिळेकरनगर, कोंढवा-येवलेवाडी आदी भागातील रहिवाशांना बसत आहे.

रस्त्याला कचराकुंडीचे स्वरूप

रस्त्यांवर अनेक ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने वाहतुक कोंडीला आमंत्रणच मिळत आहे. भाजीपाला आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांसोबत नागरिकांकडून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा रस्त्याच्या कडेला टाकला जात आहे. कचरा टाकताना मोठ्या प्रमाणांवर प्लास्टिकच्या पिशव्यांतून टाकला जातो. त्यातच त्या प्लास्टिकच्या पिशव्या डुकरे आणि भटके श्वान रस्त्यावर आणतात. त्यावरून वाहने घसरून अपघात घडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

शत्रुंजय मंदिर चौक अधिक धोकादायक

कात्रज कोंढवा रस्त्यांवरी या चौकातून अवजड वाहने धोकादायकरित्या वाहतूक करतात. गाड्यांमधून वाहून नेण्यात येणारी रेती, माती, सिमेंट काँक्रीटचा माल रस्त्यांवर पडतो. त्यामुळे अनेकवेळा दुचाकी घसरून अपघात होतात. त्याचबरोबर या चौकाजवळ कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामासाठी मोठा खड्डा खणण्यात आला आहे. त्यामुळे चौकात रस्ता निमुळता झाला असून वाहतूक कोंडी होते.

भाजीवाले आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी रस्त्यावर सरसकट अतिक्रमने केली आहेत. त्यामुळे रस्त्यावर पार्किंगची परिस्थितीसुद्धा गंभीर आहे. अनेकवेळा अपघात झाले आहेत. तरी महापालिका प्रशासन व पोलिस अपेक्षित लक्ष देत नाहीत. - महेंद्र कर्नावत, कोंढवा डेव्हलपमेंट फोरम.

वाहतुकीच्या समस्यांबाबत माहिती घेऊन पोलिस निरिक्षकांना कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बाबींवर महापालिका प्रशासनासोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न चालू आहे. काही ठिकाणी खाजगी जागेमुळे हा प्रश्न उद्भवत आहे. - राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त (वाहतूक विभाग)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT