Traffic jam on mumbai-bangalore highway vehicles at Katraj Dari Bridge to Warje police pune sakal
पुणे

Pune Traffic : मुंबई-बंगळुरु महामार्गावर वाहतूक ठप्प; कात्रज दरी पुलापासून वडगाव पर्यंत ट्रॅफिक, वाहनांच्या रांगा

कात्रज दरीपूलापासून ते वडगाव पुलापर्यंत रांगा; आठ किलोमीटरसाठी पाच ते सहा तासांचा कालावधी

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज : मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वडगाव (बु) येथील मुठा नदी पुल परिसरात रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुक व्यवस्था ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. या रस्त्यावर झालेल्या खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी संथ होत असून अवजड वाहनांची संख्या मोठी आणि रस्ता अरुंद असल्याने हा परिणाम झाला आहे.

वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या नवीन कात्रज बोगद्यापर्यंत रांगा लागल्या होत्या. हे अंतर १२ ते १४ किलोमीटरचे आहे. या अंतरासाठी अवजड वाहनांना पाच ते सहा तासांचा कालावधी लागत होता. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

या वाहतूक कोंडीचा परिणाम वडगाव, धायरी, नऱ्हे, आंबेगाव, कात्रज, भारती विद्यापीठ परिसरातील अंतर्गत वाहतूकीवर झाला होता. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

दोन दिवसांपासून सुरु असलेले हे काम आणि त्यात शनिवार रविवारी सुटी असल्याने रस्त्यांवर वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे हा परिणाम झाला. शिरवळ परिसरातून येणाऱ्या सिद्धू कुद्रिमोती यांच्यासह अनेक चाकरमान्यांनी कात्रज बोगद्यापर्यंत प्रवास केल्यानंतर ही वाहतूक कोंडी पाहून शहरात चालत येणे पसंत केले.

पुढील वाहतूक कोंडीचा अंदाज आल्यानंतर अनेक वाहनचालक जुन्या कात्रज बोगद्यामार्गे शहरात येण्याचा पर्याय निवडत होते. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळे नवलेपुलाखालीही मोठी वाहतूककोंडी झाली होती. त्याच्या लांबच लांब रांगा कात्रज-नवलेपुल रस्त्यावर लागल्या होत्या.

वडगाव पुलावर खड्डे पडल्याने त्याठिकाणी ते बुजविण्याचे काम दोन दिवसांपासून हाती घेण्यात आले होते. मात्र, त्याचा उलट परिणाम झाला आणि ते खड्डे बुजविताना मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने आणि पावसामुळे प्रशासनाला खड्डे बुजविणे अशक्य झाले. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाकडून पुलावरील पूर्ण डांबरीकरणच काढून टाकून रस्ता स्वच्छ करण्यात आला आहे.

दोन दिवसांपासून ही वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलिस पुर्णपणे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुर्ण प्रयत्न करत आहे. मात्र, वडगाव पुलावरील खड्ड्यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. - प्रशांत कणसे, सहायक पोलिस निरिक्षक, भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन (वाहतूक)

रस्त्यावर खड्ड्यामुळे वाहतूक संथ होत असल्याचे लक्षात घेऊन एका बाजूने वाहतूक बंद करुन रस्ता स्वच्छ करण्याचे काम चालू असल्याने ही वाहतूक कोंडी झाली होती. आता रस्त्याच्या दोन्ही वाहतूक सुरु करण्यात आली असून वाहतूक सुरळित होईल.

- भारत तोडकरी, सल्लागार अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: भारतीय कर्णधारावर ICC ने कारवाई केली, BCCI ची सटकली! थोपटले दंड, प्रकरण आता आणखी तापणार...

Visa Free Countries: व्हिसा फ्री प्रवास करायचा आहे? या ५८ देशांमध्ये फिरा एकदम बिनधास्त, मिळवा संपूर्ण यादी एका क्लिकवर!

आलाय 'टीजर' व्हा 'हजर'..!! ‘वेल डन आई’ची प्रेक्षकांना उत्सुकता; विशाखा सुभेदार दिसणार हटके भूमिकेत

Kolhapur News : पूरग्रस्तांसाठी आमदार अमल महाडिक यांचा मदतीचा हात! स्वखर्चातून दिले १५०० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य

IND vs SL Live: जसप्रीत बुमराहसह अष्टपैलू खेळाडूला विश्रांती; दोन बदलांसह टीम इंडिया श्रीलंकेचा सामना करणार

SCROLL FOR NEXT