narayangaon, Pune, traffic ,Pune Nashik Highway 
पुणे

नो पार्किंग झोनमध्ये वाहनतळ : पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीत भर

रवींद्र पाटे

नारायणगाव: येथील पुणे नाशिक महामार्गालगत बस स्थानक परिसरात नो पार्किंग झोनमध्ये चार चाकी व दुचाकी वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या वाहनांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी मुक्ताई देवस्थान ट्रस्टचे संचालक मुरलीधर फुलसुंदर यांनी केली आहे.

मागील एक महिन्यापासून येथील पुणे नाशिक महामार्गावर मीना नदी पूल ते रिगल पेट्रोल पंप दरम्यान व खोडद,जुन्नर रस्ता या भागात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहन चालक, प्रवाशी  त्रस्त झाले आहेत. सद्य स्थितीत जुन्नर, संगमनेर तालुक्यातील विविध भागातील अत्यावस्थ व कोरोना  रूग्ण रुग्णवाहिकेतून पुणे येथे नेले जातात. वाहतूक कोंडीचा सर्वात जास्त फटका रुग्णांना बसत आहे. 

येथील महामार्गालगत कुरेशी मार्केट, फुलसुंदर मार्केट व बसस्थानक आवारात मोठ्या प्रमाणात चार चाकी व दुचाकी वाहने उभी केली जातात.या मुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.या पुर्वी या भागात वाहने उभी केल्यास पोलीस वाहनाला जॅमर लावून दंडात्मक कारवाई करत होते.माजी आमदार, जुन्नर पंचायत समितीच्या माजी सभापती यांच्या वाहनावर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र मागील सहा महिन्यात दंडात्मक कारवाईत शिथिलता आल्यामुळे नो पार्किंग झोनमध्ये चार चाकी व दुचाकी वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 नारायणगाव ही मोठी बाजारपेठ आहे.मात्र पे पार्किंगची सोय नसल्याने खरेदीसाठी आलेले ग्राहक  वाहने महामार्गाच्या लगत उभी करतात.मीना नदी काठावर असलेल्या मुक्ताई देवस्थानच्या मोकळ्या जागेत पे पार्किंगची सुविधा ग्रामपंचायतने केल्यास पार्किंगची गैरसोय दूर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT