Traffic-Police 
पुणे

Lockdown : खाकीमधील माणुसकीचे दर्शन घडले; पदरमोड करून भरवताहेत 'पीठलं-भाकरी'!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात संचारबंदी सुरु असल्याने खासगी व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. खासगी वाहनाना पेट्रोल बंद झाले, हॉटेल बंद झाले. त्यामुळे बाहेर गावी जाणाऱ्या प्रवासी, मालवाहू वाहनाचे चालक, क्लीनर व भिक्षेकरी यांचेही जेवणाचे हाल होऊ लागले. अन्नासाठी दाही दिशा फिराव्या लागत आहेत.

अशातच खाकी वर्दीमध्ये दडलेला "माणूस" जागा झाला आणि त्या भुकेल्याला पीठलं-भाकरी देऊन त्यांचा आत्मा तृप्त करु लागला, पदरमोड करुन दररोज 50-100 लोकांना अन्नदानाचे काम करीत आहेत, हडपसर वाहतूक विभागाचे पोलिस अधिकारी-कर्मचारी!

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या, विनाकारण शहरात फिरणार्याना पोलिसांनी लाठीमार करीत माघारी पिटाळल्याचे सिंहगड रस्ता परीसरातील व शहरातील अन्य ठिकाणचे व्हिडिओ आपण पाहिलेच आहेत. त्यावरुन पोलिसांमधील संवेदनशीलतेवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उपस्तस्थित करण्यात आले. एकिकडे पोलिसांची अशी बाजू दिसत असतानाच दुसरीकडे पोलिसांच्या खाकी वर्दीमध्ये दडलेला माणुसकीचेही आता दर्शन होऊ लागले आहे. 

सोलापूर, नगर व अन्य राज्यमध्ये जाणाऱ्या वाहनाना हडपसर येथून जावे लागते. मात्र संचारबंदीमुळे सार्वजनिक, खासगी वाहतूक बंद झाली. सामान्य नागरीकांसाठी पेट्रोल बंद झाले. त्याचबरोबर होटेल्स, चहा, भजीपाव, वडापावचे स्टॉल्स, हातगाड्याही बंद झाल्या. त्यातच वाहतूक थांबविल्याने अनेक मालवाहु गाड्याचे, खासगी गाड्याचे चालक, प्रवासी यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ होऊ लागली. त्यांच्यासह निराधार, भिक्षेकरी यांची अन्नासाठी अक्षरश: आबाळ होऊ लागली. ही परिस्थिती हडपसर वाहतुक विभागचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कोली यांनी पाहिली. त्यानंतर त्यानी वाहतूक विभागामध्ये काम करणाऱ्या आपल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना या लोकाना जेवण देण्याची संकल्पना मांडली. त्यांनी ही सकारात्मक प्रतिसाद दिला. 

सध्या हडपसर वाहतुक विभागाकडुन दररोज 50 ते 100 जणाना विनामूल्य जेवण दिले जात आहे. पिठल-भाकरी, भात व पाणी असा आहार दिला जातो. याविषयी सहायक पोलिस निरीक्षक गजानन भोसले म्हणाले, "संचारबंदी सुरु असल्याने हॉटेल्स, खाद्य पदार्थचे स्टॉल्स, दुकाने बंद आहेत. त्यामुळे गरीब नागरिक, भिक्षेकरी, प्रवासी, वाहनाचे चालक यांची जेवणाची हाल होऊ लागले. त्यामुळे आम्ही त्यांना खानावळीतून जेवण आणून देतो. दररोज 50-100 जण जेवतात. त्यासाठी जास्त पैसे लागत नाहीत, आम्ही पदरमोड करुन करतो, मात्र त्यामुळे आम्हाला मनापासून समाधान मिळते."

बिबवेवाडी येथील एका कुटुंबाने नियंत्रण कक्षाला संपर्क करुन हाताला काम नसल्याने उपासमार होत असल्याचे सांगितले. त्यानुसार बिबवेवाडी पोलिस ठान्याच्या सहायक पोलिस निरीक्षक अमृत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी कुटुंबाची भेट घेऊन त्यांना तांदूळ, साखर, बटाटा, तेल, दूध व भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तू खरेदी करुन दिल्या.

दत्तवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी आपल्या हद्दीत संचारबंदीच्या बंदोबस्ताचे काम करीत आहेत. त्यामुळे पोलिसांचा अनेक नागरीकाची भेट होते. पोलिसांना व अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी पोलिस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी सॅनीटायझर, मास्क उपलब्ध करुन दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Gold: सरकार मंदिरांमधील सोने जप्त करण्याच्या तयारीत आहे का? जाणून घ्या सत्य काय?

India Vs Afghanistan: विराटला क्लीन बोल्ड करणाऱ्या गोलंदाजावर निवड समितीची नजर

"नटसम्राट नाटक केलं असतं तर मी मेलो असतो"; नाना पाटेकरांची उघड कबुली

Pimpri Chinchwad News: धार्मिकतेच्या नावे भूखंड हडपण्याचे उद्योग; पिंपरी चिंचवडमधील कारभाऱ्यांचे कारनामे, अनेक ठिकाणी अतिक्रमणे!

Ahilyanagar Crime: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष; विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाला १० वर्षांची शिक्षा,न्यायालयाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT