पुणे

धक्कादायक : बारामतीत खोकल्याचे औषध समजून किटकनाशक सेवनाने पोलिसाचा मृत्यू

मिलिंद संगई

बारामती : येथील तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी पोपट विष्णू दराडे (वय 45, रा. अकोले, ता. इंदापूर) यांचा आज दुर्देवी मृत्यू झाला. खोकल्याचे औषध समजून किटकनाशकाचे सेवन केल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोपट दराडे हे आपली डयूटी संपवून घरी गेल्यानंतर त्यांना खोकल्याचा त्रास होत होता म्हणून त्यांनी खोकल्याचे औषध समजून घाईत शेतात फवारणी करण्याचे किटकनाशक सेवन केले. त्या नंतर काही क्षणातच त्यांना आपली चूक लक्षात आली. त्यांनी तातडीने कुटुंबियांना याची कल्पना दिली. त्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले गेले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

पोपट दराडे हे धडाडीचे पोलिस कर्मचारी म्हणून प्रसिध्द होते. त्यांनी पुणे शहर, देहू रोड, इंदापूर, बारामती शहर व बारामती तालुका पोलिस ठाण्यात काम केले आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या सहका-यांनाही आज कमालीचा धक्का बसला. दरम्यान बारामती तालुका पोलिस ठाण्यात त्यांच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आल्याचे पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी सांगितले. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : पुणे जिल्ह्यात नराधमाचा अमानुषपणा! चिमुरडीच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; आरोपीला मिळणार मृत्यूदंडाची शिक्षा?

Latest Marathi News Live Update : 12 वी च्या निकालात, बुलढाणा जिल्हाचा निकाल 95.22 % टक्के

Hasan Mushrif Statement : “गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावूनच प्रतिक्रिया,” हसन मुश्रीफांनी शिवाजी पाटलांना थेट डिवचलं

Mumbai: पुनर्वसन ४० वर्षे रखडले; उच्च न्यायालयाचे केंद्र, ‘जेएनपीए’ला खडे बोल

Shahuwadi crime : कोल्हापुरातील मलकापूरमध्ये धक्कादायक घटना; सख्या भावानेच केला भावाचा खून, भाऊ फरार

SCROLL FOR NEXT