पुणे

कामशेतमध्ये ट्रेलरचालकाला मारहाण; अन्...

सकाळवृत्तसेवा

कामशेत : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाथरगावजवळ ट्रेलर चालकाला मारहाण करून लुटण्यात आल्याचा प्रकार घडला. ट्रेलरमध्ये बिघाड झाल्याने रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. त्यामध्ये चालक झोपला होता. त्याला तिघांनी मारहाण केली. तसेच त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल, असा मुद्देमाल चोरून नेला.

कामशेत पोलिसांच्या सतर्कतेमुळे या तीन आरोपींना संध्याकाळ पर्यंत अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी धर्मात्मा विवेकनंद पटेल (वय 30 रा. मूळ मु. भरकना पोस्ट सिदद्वार ता. घोराबन राज्य-उतरप्रदेश, सध्या रा. जसय उदान जि रायगड) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

धीरज सुधीर गरवड (रा. भाजे,) उमेश वसंत बालगुडे (रा. पाथरगाव ता मावळ जि पुणे), प्रविण मुरलीधर सावंत (रा. सावंतवाडी महागाव जि पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धर्मात्मा विवेकनंद पटेल हा त्याच्या जवळील ट्रेलर (क्र एमएच १६ बीएफ ६४५७) मध्ये सोयाबीन माल भरून नवघर मुंबई येथून बीडकडे जाण्यासाठी निघाला होता. यादरम्यान मुंबई पुणे महामार्गावर पाथरगाव कामशेत खिंडीत बिघाड झाल्याने ट्रेलर बंद पडला. गाडी दुरुस्त न झाल्याने ट्रेलर चालक गाडीत झोपला होता. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन यातील तीन आरोपींनी शनिवार (ता.22) रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास गाडीच्या जवळ येऊन ट्रेलर चालकास दरवाजा उघडण्यास सांगितला.

त्यानंतर तिघेही क्लीनर साइडची काच फोडून गाडीत घुसले व फिर्यादी यास लाकडी काठीने डोक्यावर, हातावर, पायावर, जबर मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल 3500 रुपये रोख रक्कम जबरदस्ती चोरून त्यांच्याकडील टेम्पो (क्र.एमएच १४ जीयू ७१६७) मधून लोणावळा दिशेने पळून गेले.

याबाबत फिर्यादीने माहिती देताच कामशेत पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT