Online
Online 
पुणे

नवीन सदनिकांचा व्यवहार ऑनलाइन

सकाळवृत्तसेवा

पुणे - लॉकडाउनमुळे दस्त नोंदणी कार्यालये बंद आहेत. या पार्श्वभूमीवर नोंदणी व मुद्रांक विभागाने सदनिकांची दस्त नोंदणी ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधा फक्त नवीन सदनिकांसाठीच असणार आहे. जुन्या सदनिका आणि भूखंड यांच्यासाठी ऑनलाइन दस्त नोंदणीची सुविधा मिळणार नाही.

विकासकांच्या विक्री करारनाम्याच्या नोंदणीसाठी ई रजिस्ट्रेशन सुविधेचा वापर वाढविण्याचा निर्णय नोंदणी विभागाने घेतला आहे. ई रजिस्ट्रेशनसाठी आवश्‍यक ते बदल करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ई रजिस्ट्रेशन प्रणाली अंतर्गत प्रथम करारनाम्याच्या नोंदणीसाठी सद्यस्थितीत ५०० दस्तांची अट रद्द करण्यात आली असून त्या प्रकल्पातील किमान 20 सदनिका अथवा दुकाने यांची विक्री करार नोंदणी करणे आवश्‍यक आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्याचबरोबर ई रजिस्ट्रेशन सुविधा वापरण्यासाठी एमपीएलएस व्हीपीएन ही इंटरनेट सुविधा आवश्‍यक होती, त्यामध्येही आता सवलत देण्यात आली असून साधी इंटरनेट सुविधा असेल तरीही नोंदणी करता येणार आहे. नोंदणी उपमहानिरीक्षक यांनी, ई रजिस्ट्रेशन सुविधेची माहिती जास्तीत जास्त विकासकांपर्यंत पोचवावी, त्याचबरोबर जास्तीत जास्त विकासकांना या प्रणालीमध्ये सामावून घेण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सुचना नोंदणी महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख यांनी दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT