बिबट्या रस्ता ओलांडताना दोन दुचाकीस्वार थोडक्यात बचावल्याने प्रवाशांमध्ये घबराट झाली. त्याच वेळेस मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचे प्रवीण मोडक यांनी सांगितले.
फुरसुंगी : दिवेघाटात (Dive Ghat Pune) आज (शनिवार) सकाळी साडे दहा वाजता प्रवाशांना बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्या (Leopard) दिसल्याने येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वडकी (Wadki) ग्रामस्थांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागील दोन दिवसांपासून बिबट्या दिसत असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत होते. मात्र, कोणाकडे असा फोटो किंवा चित्रीकरण आढळले नाही. तरीही ग्रामस्थ सावधगिरी बाळगून होते. सासवडकडून वडकीकडे येताना घाटाच्या उताराला वडकीपासून तिसऱ्या वळणावर बिबट्या डोंगरावरून उतरून अचानक झाडांमध्ये जाताना वडकीतील नागरिकांना दिसला.
बिबट्या रस्ता ओलांडताना दोन दुचाकीस्वार थोडक्यात बचावल्याने प्रवाशांमध्ये घबराट झाली. त्याच वेळेस मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचे प्रवीण मोडक यांनी सांगितले. सध्या पावसाळा सुरु झाला असल्याने आणि पर्यटनासाठी कमी धोका असल्याने बरेच पर्यटक लहान मुलांना घेऊन येथील धबधबे आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येत असतात. अनेकजण सेल्फी घेण्याच्या नादात असतात. पर्यटकांनी सहलीचा आनंद घेताना काळजी घेणे गरजेचे आहे. शक्यतो, एकटे न राहता जमावाने राहावे, असे येथील ग्रामस्थ शिवाजी काळाने, अक्षय खुटवड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.