Tree Burn Fire on Baner Tukai hill  
पुणे

बाणेर येथील तुकाई टेकडीवर आग; अनेक झाडे जळून खाक

सकाळवृत्तसेवा

बालेवाडी(पुणे) : बाणेर येथील तुकाई टेकडीवर टेकडीच्या मागच्या बाजूला म्हणजेच पाषाणच्या बाजूला (ता.21) दुपारी एकच्या दरम्यान आग लागली. या आगीत वसुंधरा अभियान कडून जोपासना करण्यात आलेल्या अनेक झाडांचे नुकसान झाले असून या आगीमुळे मोठ्या प्रमाणात जैवविविधता नष्ट झाली आहे.                            

बाणेर येथे तुकाई टेकडी असून, येथे  2006 पासून वसुंधरा अभियानकडून हजारो झाडांचे वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धनाचे काम लोकसहभागातून केले जाते. या टेकडीवर (ता. 21) रोजी दुपारी एकच्या दरम्यान पाषाणच्या बाजूला आग लागलेली. ही आग कशी लागली हे समजले नाही. पण, दरवर्षी फिरायला येणारे नागरिकांकडून असे दुष्कृत्य केली जातात याची माहिती वसुंधरा अभियान सदस्यांकडून देण्यात आली. या आगीमध्ये अनेक झाडे होरपळली असून या भागात निर्माण झालेल्या जैवविविधतेला या आगीची झळ पोहोचली आहे. या वर्षी भरपूर पाऊस झाल्याने टेकडीवर खूप गवत वाढले असून ते आता सुकले असल्यामुळे व टेकडीवरती सर्व बाजूंनी वारा असल्यामुळे थोड्यावेळात ही आग मोठ्या प्रमाणामध्ये पसरली. आग विझवण्यासाठी वसुंधरा अभियानचे सदस्य टेकडीवर पोहोचले  असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. 

वसुंधरा अभियानकडून नागरिकांना कळकळीचे आव्हान
टेकडीवरती फेरफटका मारायला गेल्यावर जर कोणी असे दुष्कृत्य करत असेल किंवा धुम्रपान करून पेटती बिडी किंवा सिगारेट  टेकडीवरचे टाकत असेल तर त्यांना त्वरित अटकाव  करावा, अशी त्यांना विनंती करावी जेणेकरून टेकडीवरती आग लागून   झाडांचे, जैवविविधतेचे  नुकसान होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D-Mart मध्ये शॉपिंगची तयारी करताय? आधी हे वाचा... नाहीतर खिसा होणार रिकामा! मुंबईतील धक्कादायक प्रकाराने सगळे हैराण

Google Maps : गुगल मॅपमध्ये गेमचेंजर फीचरची एन्ट्री; ट्रॅफिक, छुपे कॅमेरे अन् लँडमार्कची अचूक माहिती..कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Nashik Election : "सर्वांत मोठा भ्रष्टाचार म्हणजे मतचोरी" : नाशिक काँग्रेसचा 'वोट चोर, गद्दी छोड' अभियानातून भाजपवर हल्लाबोल

Kolhapur Crime News : धक्कादायक! रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीची छेडछाड; पालकांनाही धमकी, कोल्हापूरात खळबळ

Eknath Shinde : एकनाथ शिंदेची शिवसेना कोल्हापुरात स्वबळावर लढणार का? कार्यकर्त्या बैठकीत काय झाला निर्णय

SCROLL FOR NEXT