tree planting.jpg 
पुणे

काय सांगता !  झाडांसाठी 'ते' राजकारणच विसरले?

रमेश वत्रे

केडगाव (पुणे) : केडगाव (ता. दौंड) येथील गायरानातील अतिक्रमण रोखण्यासाठी युवकांनी वृक्षारोपणाची नामी शक्कल लढवली आहे. इतर कामात राजकारण असले तरी वृक्षारोपणाच्या कामांमध्ये येथील युवक गट-तट विसरून काम करत असल्याने ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहे. या युवकांनी एका महिन्यात 600 झाडे लावली आहेत. युवकांच्या या प्रयत्नांना केडगाव ग्रामपंचायतीने ही साथ दिली आहे. 

केडगावच्या माळरानावर सहाशे झाडे ठिबक सिंचनसह लावण्यात आली आहेत. झाडे लावल्यानंतर पाऊस चांगला झाल्याने झाडांना टवटवी आहे. केडगाव हद्दीत 142 एकर गायरान जमीन आहे. अतिक्रमणामुळे ही जमीन संपत आली आहे. येथील देशमुख मळा परिसरात गायरान जमीन आहे. या जमिनीवर अनेक लोकांनी अतिक्रमण केले आहे. काही जणांनी जागा धरून कंपाउंड करून त्या चढ्या भावाने विकल्या आहेत.

देशमुख मळा हा केडगाव ग्रामपंचायत स्वतंत्र महसुली भाग आहे. मात्र, विकास कामांसाठी अतिक्रमणामुळे जागा भविष्यात शिल्लक राहणार नाही, असे सध्याचे येथील चित्र आहे. हे संकट टाळण्यासाठी येथील युवकांनी एकत्र येत गावठाण जागेवर वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम हाती घेतला. युवकांनी लोकवर्गणी करत सात एकर जागेचे सपाटीकरण केले असून चार एकर जागेला तार कंपाउंड करून त्यात ही झाडे लावली आहेत, असे ग्रामपंचायत सदस्य मनोज शेळके व धोंडिबा शेळके यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


अशी मिळाली मदत 

  • केडगाव येथील हॉटेल व्यावसायिक ब्रह्मानंद सुभाष निंबाळकर यांच्याकडून मोफत आठ हजार लिटरची पाण्याची लोखंडी टाकी 
  • मनोज देशमुख यांनी या झाडांना स्वतःच्या विहिरीतून पाणी उपलब्ध करून दिले 
  • "एक मित्र एक वृक्ष' संस्थेकडून 400 झाडे 
  •  जवाहरलाल विद्यालयाचे माजी प्राचार्य विठ्ठल सानप व भालचंद्र महादेव टिळेकर यांनी प्रत्येकी 100 देशी झाडे 

केडगावमधील युवक विधायक काम करीत असल्याने ग्रामपंचायतीने त्यांना मदत केली आहे. ग्रामपंचायतीने वृक्षांसाठी दहा हजार फुटांचे ठिबक सिंचन केले आहे. याशिवाय चौदाशे फूट लांबीची पाइपलाइन करून ती ठिबकला जोडली. या पुढील काळातही या युवकांना मदत केली जाईल. 
- अजित शेलार (सरपंच), अशोक हंडाळ (उपसरपंच) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT