पुणे

प्रत्येक विद्यार्थ्याने एक तरी झाड लावावे ः खरमाळे

CD

आळेफाटा, ता. ३ ः ‘‘पृथ्वीवरील मानवाचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने एक तरी झाड लावावे,’’ असे आव्हान शिवनेर भूषण रमेश खरमाळे यांनी आळे या ठिकाणी केले.
राष्ट्रीय हरित सेना उपक्रमांतर्गत आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्विस पुणे यांच्यामार्फत मंगळवारी (ता. ३) पर्यावरण विषयक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जैवविविधता या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खरमाळे बोलत होते.
यावेळी कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्विस पुणे प्रतिनिधी माधवी देशमुख, ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक किशोर कुऱ्हाडे, कैलास काळे, प्राचार्य संदीप भवारी आदी उपस्थित होते. यावेळी ‘वेस्ट टू बेस्ट’ या संकल्पनेवर आधारित उपयुक्त कृती घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या विषयावरील समजुतीचे मूल्यमापन करण्यासाठी प्री टेस्ट व पोस्ट टेस्ट घेण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती निर्माण झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना भारती यांनी केले.

07703

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या पहिल्या सामन्यासाठी संजू सॅमसनला संधी, तर इशान किशन, कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

Paschim Maharashtra Temple Recruitment 2026: पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरांसाठी लवकरच भरली जाणार नवी पदे; बक्कळ पगार अन् मिळणार ही सुविधा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील विमाननगर परिसरात जोरदार राडा

कोण्या दिग्गज व्यक्तीने नाही तर 'या' माणसाने दादा कोंडकेंना दाखवली पांडू हवालदार सिनेमातील मोठी चूक

SCROLL FOR NEXT