The trend of making eco friendly rakhi at home 
पुणे

यंदाचा श्रावण : घरच्या घरी पर्यावरणपूरक राखी बनवण्याचा ट्रेंड

नीला शर्मा

पुणे : यंदा करोनाचं सावट असलेल्या श्रावणात राखीचंही रूप पालटलेलं अनेक घरांमध्ये दिसणार आहे. बाजारात मिळतील त्या राख्या सॅनिटाइज केलेल्या असतील की नाही, या शंकेने कित्येक घरांमध्ये सहज उपलब्ध वस्तूंपासून राखी तयार करणाऱ्या बहिणी दिसत आहेत. प्रज्ञा देवधर या तरुणीनेही मोठ्या व छोट्यांसाठी कल्पकतेने पर्यावरणपूरक राख्या बनवल्या आहेत. 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

प्रज्ञा म्हणाली, " घरातल्या घरात राहून, सहज उपलब्ध साहित्य वापरूनसुद्धा खूप सुंदर राख्या तयार करता येतात, याचा अनुभव मी सध्या घेते आहे. यात  स्वतः बनवलेल्या राख्या भावांच्या हातावर बांधण्याची विशेष गंमत अनुभवता येईल. शिवाय त्यात प्लॅस्टिक नाही. पर्यावरणपूरक साहित्य उपयोगात आणल्याचं अवर्णनीय समाधान आहे. दोन - तीन महिन्यांपासून मी क्रोशावर्क शिकते आहे. या माध्यमातून लोकरीची फुलं बनवली. त्यांवर मण्यांची सजावट केली. यापासून राखी तयार करताना मला आणि ती बघताना माझ्या मुलांनाही मौज वाटली. घरी तऱ्हेतऱ्हेच्या लग्नपत्रिका व निमंत्रण पत्रिका साठलेल्या होत्याच. त्यावरील आकर्षक चित्रं कापली. सॅटिनच्या रंगीत पट्टीवर एक - एक चित्र चिकटवून सुंदर राख्या तयार करता आल्या. "
 

कोरोनाची साथ असताना, दुसरीकडे एक लाखाहून अधिक ज्येष्ठांना अन्य आजार 

प्रज्ञाने असंही सांगितलं की, ''मोठ्या भावांपेक्षा छोट्या भावांसाठीच्या राख्या मजेशीर बनवण्याचा विचार केला. जाड कागदातून छोटे छोटे गोल आकार कापले. त्यांवर कलिंगडाची लालचुटुक फोड, तिच्यावरील काळ्याशार बिया दिसतील, असं चित्र रंगवलं. बच्चे कंपनीला आवडणारी कार, सूर्य यांसारख्या चित्रमय राख्या तयार केल्या. माझी मुलं झाडांना राख्या बांधतात. त्यांच्या मनातलं निसर्गप्रेम वाढत राहावं, या भावनेने मी काही राख्यांवर पानं, फुलं व पक्ष्यांची चित्र काढली आहेत.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water: उन्हाळ्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणीसंकट! सातही धरणांतील साठ्यात घसरण; 'या' दिवसापासून पाणीकपात जारी

स्वस्त हॉटेल, कमी बजेट आणि इंटीमसीचा भडीमार, कुठे आणि कसा शूट होतो बी-ग्रेड सिनेमा?

Panand Road Scheme : अक्षय तृतीयेला पाणंद रस्ते योजनेचा प्रारंभ, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

SCROLL FOR NEXT